शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेसह तरुणीला भरधाव वाहनाने चिरडले; माेहघाटा जंगलातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 10:55 IST

सुरुची व साेनाली या दाेघीही दुचाकीने लाखनीहून साकाेलीकडे जात हाेत्या. दरम्यान, माेहघाटा जंगल शिवारात त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.

ठळक मुद्देसाकोली तालुक्याच्या माेहघाटा जंगलातील घटना

साकाेली (भंडारा) : दुचाकीने लाखनीहून साकाेलीकडे जात असताना माेहघाटा जंगलात अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात महिलेसह तरुणी ठार झाली. हा अपघात साेमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास झाला.

सुरुची रवींद्र मल्लेलवार (२६), रा. खुटसावरी, ता. भंडारा व साेनाली राहुल सांगीडवार (२८), रा. अकापूर, ता. मूल, जि. चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत. माहितीनुसार सुरुची व साेनाली या दाेघीही दुचाकीने लाखनीहून साकाेलीकडे जात हाेत्या. दरम्यान, माेहघाटा जंगल शिवारात त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात दाेघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपजिल्हा रुग्णालय, साकाेली येथे दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले; परंतु वाटेतच साेनाली यांचा मृत्यू झाला, तर सुरुची हिचा भंडारा येथे खासगी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

तीन महिन्यांत दुसऱ्यांदा दु:खाचा डाेंगर

सुरुची ही वैद्यकीय शिक्षण घेत हाेती. दाेन बहिणी, एक भाऊ व आई असा सुरुचीचा परिवार आहे. उल्लेखनीय म्हणजे तीन महिन्यांपूर्वी ३ जानेवारीला सुरुचीच्या वडिलांचा मृत्यू झाला हाेता. अवघ्या तीन महिन्यांतच सुरुचीचा अकाली मृत्यू झाल्याने मल्लेलवार कुटुंबीयावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. सुरुचीची आई ही गाेंडउमरी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेली साेनाली ही गृहिणी असून तिचे पती लाइनमन आहेत. साेनालीला अडीच वर्षांची मुलगी आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूsakoli-acसाकोली