शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
3
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
4
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
5
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
6
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
7
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
8
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
9
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
10
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
11
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
12
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
13
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
14
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
15
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
16
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
17
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
18
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
19
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
20
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   

बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 05:00 IST

कुलदीप गिरधर नारनवरे (३५, रा. धानोरी, कोसमतोंडी, जि. गोंदिया) असे मृताचे नाव असून, ते लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होते. मंगळवारी दिवशी दुपारी २ वाजताच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच ३५-वाय ६४८३) पारडी येथून तई येथे नातेवाइकाकडे जात होते. त्यावेळी बारव्हा येथून साकोलीकडे जाणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच १२ - ईएफ ६९१९) खोलमारा गावातल्या वळणावर दुचाकीची सामोरून धडक दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : भरधाव एसटी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक ठार झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील बारव्हा ते खोलमारा रस्त्यावरील टी-पॉइंट वळणावर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. नातेवाइकाच्या भेटीसाठी जाताना हा अपघात घडला. कुलदीप गिरधर नारनवरे (३५, रा. धानोरी, कोसमतोंडी, जि. गोंदिया) असे मृताचे नाव असून, ते लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होते. मंगळवारी दिवशी दुपारी २ वाजताच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच ३५-वाय ६४८३) पारडी येथून तई येथे नातेवाइकाकडे जात होते. त्यावेळी बारव्हा येथून साकोलीकडे जाणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच १२ - ईएफ ६९१९) खोलमारा गावातल्या वळणावर दुचाकीची सामोरून धडक दिली. धडक एवढी जबर हाेती की शिक्षक कुलदीप दुचाकीसह खाली काेसळून गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती हाेताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे असलेल्या नागरिकांनी गंभीर अवस्थेत त्यांना बारव्हा आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिक्षक कुलदीप यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील आहेत. मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित असलेल्या शिक्षकांच्या मृत्यूने बारव्हा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंचनामा दिघाेरीचे सहायक पाेलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय ग्यानिराम गोबाडे, पोलीस नायक कोडापे, पुराम, वैद्य, रणदिवे यांनी केला.

एसटीने घेतले दाेन दिवसात दाेन बळीभंडारा शहरातील राजीव गांधी चाैकात एसटी बसने साेमवारी दुचाकीला धडक दिल्याने पाेलीस हवालदार दुलीचंद बरवैय्या यांचा साेमवारी मृत्यू झाला हाेता. या अपघातानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी एसटी बसच्या धडकेत शिक्षक ठार झाला. दाेन दिवसात दाेन कर्मचाऱ्यांचा एसटीने बळी घेतला. 

 

टॅग्स :Accidentअपघात