‘त्या’ अपघातातील मृतांची संख्या दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:54 PM2019-03-18T22:54:39+5:302019-03-18T22:54:55+5:30

लाकडे खाली करून पहेलाकडे जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रेलरने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली होती. यात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली. त्यात ट्रालीमध्ये बसलेले दोघेजण त्यांत राजकपूर लक्ष्मण राऊत (३४) हा जागीच ठार झाले होते. तर गंभीर जखमी असलेला उमेश्वर परसराम चवळे हे नागपुरला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालविली.

Two of those 'accidental deaths' | ‘त्या’ अपघातातील मृतांची संख्या दोन

‘त्या’ अपघातातील मृतांची संख्या दोन

googlenewsNext
ठळक मुद्देगावात शोककळा : एकाच वेळी दोघांवर अंत्यसंस्कार, आंबाडी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पहेला : लाकडे खाली करून पहेलाकडे जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रेलरने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली होती. यात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली. त्यात ट्रालीमध्ये बसलेले दोघेजण त्यांत राजकपूर लक्ष्मण राऊत (३४) हा जागीच ठार झाले होते. तर गंभीर जखमी असलेला उमेश्वर परसराम चवळे हे नागपुरला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालविली.
ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसलेले बळीराम परबत मरस्कोल्हे (४५), शम्मीकपूर लक्ष्मण राऊत (४८), नानेश्वर मुका भानारकर (३६) आणि ट्रॅक्टर चालक महादेव रतिराम चौधरी (४२) त्यापैकी ट्रॅक्टर चालक हा पागोरा येथील रहिवासी असून सर्व निमगावचे रहिवासी आहेत. शम्मीकपूर राऊत आणि नानेश्वर भानारकर या दोघांना किरकोळ मार असल्याने त्यांची मलमपट्टी करून जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच बळीराम मरस्कोल्हे व ट्रॅक्टर चालक महादेव चौधरी यांना गंभीर मार असल्याने ते दोघे जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार घेत आहेत.
सदर घटनेची माहिती तात्काळ निमगावला पोहचली तसेच सर्व गावकऱ्यांना एकच धक्का बसला आणि संपूर्ण गाव शोक सागरात बुडाला. रात्री निमगाव येथील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. कित्येकांच्या घरी स्वंयपाकही शिजविण्यात आले नाही.
रविवारला दुपारी २ वाजता दोन्ही मृतदेहावर शवविच्छेदन करून मृतदेह निमगावला येथे आणण्यात आले. त्यावेळेस लोकांची एकच गर्दी होती.
दोघांच्या पार्थिवावर एकाचवेळी निमगाव येथील स्मशानभूमित मुखाग्नी देण्यात आला. दोन्ही मृतकांच्या वारसांना ट्रक मालकाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे.

Web Title: Two of those 'accidental deaths'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.