उसाच्या शेतात बिबट्याचे दोन नवजात बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:45+5:30

परसटोला येथील हरिश्चंद्र डोंगरवार यांच्या शेतात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी या ऊसाच्या मळ्यात ऊस तोडणी कामगार गेले. त्यावेळी त्यांना बिबट्याचे दोन नवजात बछडे आढळून आले. याबाबत कामगारांनी शेतमालकाला माहिती दिली. त्यांनी तात्काळ वनविभागाला याप्रकरणी माहिती दिली.

Two newborn calves in a sugarcane field | उसाच्या शेतात बिबट्याचे दोन नवजात बछडे

उसाच्या शेतात बिबट्याचे दोन नवजात बछडे

Next
ठळक मुद्देपरसटोलाची घटना : १४ वनकर्मचारी तैनात, परिसरात आठ ट्रॅप कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : ऊसाच्या शेतात बिबट्याचे दोन नवजात बछडे आढळल्याची घटना लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत परसटोला येथे उघडकीस आली. दोन नवजात बछडे असल्याने आसपास बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या बछड्यांच्या सुरक्षेसाठी १४ वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
परसटोला येथील हरिश्चंद्र डोंगरवार यांच्या शेतात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी या ऊसाच्या मळ्यात ऊस तोडणी कामगार गेले. त्यावेळी त्यांना बिबट्याचे दोन नवजात बछडे आढळून आले. याबाबत कामगारांनी शेतमालकाला माहिती दिली. त्यांनी तात्काळ वनविभागाला याप्रकरणी माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी ए.जी. मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार या शेतातील ऊस तोडणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. दोन बछड्यांना वनविभागाद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. परिसरात आठ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यावरून मादी बिबट व पिलांवर नजर ठेवण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मादी बिबट पिलाजवळ आली. दूध पाजून ती टेहळणी करीत दुसरीकडे निघून गेल्याचे मेश्राम यांनी सांगितले. या परिसरात वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाचे १४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यात क्षेत्र सहाय्यक यशवंत तांडेकर, उमरझरी बीट रक्षक आर.डी. कोदाने, पिटेझरी बीट रक्षक सविता रंगारी, सोनेगाव बीट रक्षक आर.बी. पडोळे आदी कर्मचारी बिबट्याच्या बछड्यांवर नजर ठेवून आहेत. सहाय्यक उपवनसंरक्षक राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: Two newborn calves in a sugarcane field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.