शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू, गुन्हा दाखल

By युवराज गोमास | Updated: February 18, 2024 19:58 IST

लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपूरी शेतशिवारातील घटना

युवराज गोमासे/ भंडारा : शेतशिवारात पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपूरी शेतशिवारात १८ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजतादरम्यान गस्तीवरील वनरक्षकामुळे उघडकीस आली. शवविच्छेदन अहवालानंतर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

वनविभाग भंडारा अंतर्गत लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र लाखनी, नियतक्षेत्र रामपुरी गावातील शेतशिवारात दोन नर असवल मृत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांनी मौका स्थळ पाहणी केली असता श्रीराम गायधने रा. रामपुरी यांचे खासगी शेती गट क्रमांक ४४५/२ व राजकुमार कोडापे यांचे खासगी शेती गट क. ४७८ मध्ये दोन नर अस्वल मृतावस्थेत आढळले. दाेन्ही शेतकऱ्यांचे शेतशिवार जंगलालगत आहेत. प्रकरणी शवविच्छेदनाकरीता पालांदूर येथील पशुधन विकास अधिकारी देवयानी नगराळे यांना पाचारण करण्यात आले.

शवविच्छेदनानंतर दोन्ही अस्वलांचा मृत्यू जीवंत विद्युत प्रवाहाने झाल्याचा प्राथमिक अंदाज दर्शविण्यात आला. दोन्ही मृत अस्वलांच्या छातीवर विद्युत प्रवाहाच्या निशाणी दिसून आल्या. मात्र, अस्वलांचे नखे व दातांसह सर्व अवयव साबूत असल्याचे दिसून आले. प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वन्यजीव गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रकरणाची चौकशी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई, साकोली येथील सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, अतिक्रमण निर्मुलन) रोशन राठोड यांचे मार्गदर्शनात लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी, गोखले करीत आहेत. आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शवविच्छेदनावेळी मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी अजहर हुसैन व मोठ्या संख्येने वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पीक संरक्षणासाठी विद्युत प्रवाह टाळण्याचे आवाहनजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक संरक्षण करण्याकरीता विद्युत प्रवाहाचे वापर करणे टाळावे. विद्युत धक्क्याने होणारे वन्यप्राण्यांच्या नुकसानीचे अघोरी काम थांबवावे. अशा घटनांची गोपनिय माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा विभागीय कार्यालय भंडारा, वनपरिक्षेत्र कार्यालय लाखनी येथे प्रत्यक्ष येवुन माहिती देता येईल, असे आवाहन वनविभागाचेवतीने करण्यात आले आहे.

चोवीस तासातील दुसरी घटनातुमसर तालुक्यातील रोंघा नियतक्षेत्रात १७ फेब्रुवारी रोजी एका नर बिबट्याचा मृतदेह आढळला. नाल्यातील खोलगट भागात तीन ते चार दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू होवून त्याचे संपूर्ण अवयव साबूत होते. त्या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच २४ तासात दोन नर अस्वलांचा पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जीवंत विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. वनविभागाने या प्रकरणी गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा