तुमसर पोलिसांना पोलिसगिरी भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:08 AM2018-01-18T00:08:28+5:302018-01-18T00:08:56+5:30

कोणताही गुन्हा दाखल नसताना व कोणताही दोष नसताना १४ जानेवारीच्या रात्री ८ वाजता तुमसर पोलिसांनी पोलिसगिरी दाखवत जबरदस्तीने घरात शिरून एका युवकास लाठयाकाठयाने मारहाण केली.

Tumar Police will be in police custody | तुमसर पोलिसांना पोलिसगिरी भोवणार

तुमसर पोलिसांना पोलिसगिरी भोवणार

Next

राहुल भुतांगे ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : कोणताही गुन्हा दाखल नसताना व कोणताही दोष नसताना १४ जानेवारीच्या रात्री ८ वाजता तुमसर पोलिसांनी पोलिसगिरी दाखवत जबरदस्तीने घरात शिरून एका युवकास लाठयाकाठयाने मारहाण केली. व कुणालाही काहीही न सागंता गाडीत बसवून अपहरण केली, अशी तक्रार पीडित तरूणाच्या आईने पोलीस अधिक्षक व पोलीस महासंचालकाकडे केली आहे. या मारहाणीचे प्रकरण तुमसर पोलिसांना भोवणार असल्याचे दिसून येत आहे.
१४ जानेवारीला रात्री ८ वाजता अमित शामराव जगणे (२८) रा.तुमसर हा कुटूंबियासह घरी असताना तुमसर पोलीसचे ठाणेदार गजानन कंकाळे व त्यांची चमू जगणे यांच्या घराजवळ थांबली. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा अर्विभात लाठ्याकाठ्या घेऊन पटापट उतरुन थेट घरात प्रवेश केला व कुणालाही काही न सांगता अमित जगणेला बेशुध्द होईस्तोवर मारहाण केले. त्याला गाडीत डांबून नेत असतांना पोलिसांना त्यांचे पालक विचारत राहिले. परंतु त्यांना काही न सांगता घेऊन गेले. थोड्या वेळानंतर कळले की विशाल गजभिये, शुभम बावने यांनाही पोलिसांनी उचलून नेल्याचे नागरिकांकडून कळले. ही बाब पसरताच नागरिक एकत्र येऊन पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. त्यावेळी ते युवक बेशुध्द दिसून आले. दरम्यान मुलांचा गुन्हा कोणता? गुन्हा दाखल आहे का? ते दोषी आहेत का? आदी प्रश्न नागरिकांनी उपस्थित करताच पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र मुलाला ईतक्या क्रूरतेने मारताना पाहिलेल्या आई नंदा जगने हिला पाहावले नाही. अमित जगने हा अपराधी नाही. त्याने कधी कुणाचा खूनही केला नाही किंवा तो व्याभिचारी नाही. पोलिसांत कोणता गुन्हा दाखल नाही. दोष नसूनही पोलिसांनी घरात शिरुन कायद्याचे उल्लंघन करुन अमानुषपणे बेदम मारहाण केली. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पिडीताची आई नंदा जगणे हिने महासंचालकांना करून तुमसर पोलिसांवर कारवाईची मागणी केलेली आहे.

सदर तरूणांनी बाजार परिसरात व शहर वॉर्डात धुडगुस घालून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांविरूद्धची तक्रार अद्याप पोलीस ठाण्यात आलेली नाही.
- गजानन कंकाळे,
पोलीस निरीक्षक तुमसर.

Web Title: Tumar Police will be in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.