शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

ट्रकच्या धडकेत वाहनचालकाचा मृत्यू

By admin | Updated: November 27, 2015 00:48 IST

चारचाकी वाहनातून घराकडे जाणाऱ्याला विरूध्द दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली.

हलदारपुरी येथील घटना : ट्रकचालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगीभंडारा : चारचाकी वाहनातून घराकडे जाणाऱ्याला विरूध्द दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात वाहनचालकाचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील हलधरपुरीजवळ मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.सुधिर रामचंद्र कळंबे (२९) रा. रामनगर, भंडारा असे मृतकाचे नाव आहे. मृतक सुधिर हा शहरातील पांढराबोडी मार्गावरील रामनगर येथे पत्नी, आई-वडील, भाऊ यांच्यासह राहत होता. घटनेच्या वेळी तो त्याच्या आईच्या नावे असलेल्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३१ डीबी २०९४ ने घराकडे जात होता. हलधरपुरीजवळ पोहचला असता आंधळगाव येथील ट्रक क्रमांक सीजी ०४ एफडी ४८०२ मध्ये तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीतून धान भरून गडचिरोली जिल्ह्यातील वडसाकडे जाणाऱ्या या भरधाव ट्रक च्या चालकाने चारचाकी वाहनाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात वाहनातील सुधिरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा होवून ती रस्त्यालगत असलेल्या एका घरात शिरली. दरम्यान अपघाताची भीषणता लक्षात येताच वॉर्डातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र, भीषण अपघातामुळे सुधिर गाडीत फसला होता. दरम्यान डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी चारचाकी वाहनाचे पत्रे कापून त्याला बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी ट्रकचालक उमेश बोरकर (३२) रा. आंधळगांव याच्याविरूध्द भादंवी २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. ट्रकचालकाला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या घटनेचा तपास भंडारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ओ. एन. केवट करीत आहे. (शहर प्रतिनिधी)