लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भरधाव ट्रक अनियंत्रीत होऊन उलटल्याने झालेल्या अपघातात कॅबीनमध्ये अडकून वाहक जागीच ठार झाल्याची घटना येथील शासकीय आयटीआयसमोर बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. आपला सहकारी मृत्यूमुखी पडल्यानंतरही चालक मात्र घटनास्थळावरुन पसार झाला.महादेव प्यारेलाल बरभैय्या (२१) रा. कटंगी असे मृताचे नाव आहे. नागपूरवरुन मध्यप्रदेशातील कटंगीकडे माल घेऊन ट्रक क्रमांक एम ३१ क्यू ८२९१ बुधवारी रात्री जात होता. शासकीय आयटीआय समोर चालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रक उलटला. यात वाहक महादेव कॅबीनमध्ये अडकला आणि जागीच ठार झाला.अपघातानंतर ट्रक चालक सलीम शेख (४०) रा. चिखला घटनास्थळावरुन पसार झाला. या अपघातानंतर रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती. रात्री जेसीबीच्या सहायाने ट्रक बाजुला करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक जटाळ, करण गणी, वर्मा, पोलीस हवालदार गजू चव्हाण करीत आहे.तुमसर येथे रात्रीला अपघात झाल्याची माहिती होताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेवून जखमींना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कॅबिनमध्ये वाहक अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलविण्यात आली. वाहकाला बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे या मार्गावरून आवागमन करणाऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे.
ट्रक उलटून वाहक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:36 IST
भरधाव ट्रक अनियंत्रीत होऊन उलटल्याने झालेल्या अपघातात कॅबीनमध्ये अडकून वाहक जागीच ठार झाल्याची घटना येथील शासकीय आयटीआयसमोर बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. आपला सहकारी मृत्यूमुखी पडल्यानंतरही चालक मात्र घटनास्थळावरुन पसार झाला.
ट्रक उलटून वाहक जागीच ठार
ठळक मुद्देतुमसरची घटना : अपघातानंतर ट्रक चालक झाला पसार