लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाºया वीर पोलीस जवानांची आठवण म्हणुन संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृतीदिन म्हणुन पाळला जातो. त्यानिमित्ताने रविवारला पोलीस मुख्यालयतर्फे पोलीस हुतात्मा स्मारक स्मृतिस्तभं येथे सकाळी ८ वाजता श्रध्दांजली व सलामी देण्याचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी पोलीस अधिक्षक विनीता साहू व अपर पोलीस अधिक्षक रश्मि नांदेडकर, भंडाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सजंय जोगदंड, तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातून एकूण - ४१४ पोलीस अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी कर्तव्य बजावीत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांना शतश: वंदन असे बोलून शहीद पोलीसांच्या स्मृतिंना उजाळा दिला. तसेच २१ आॅक्टोबर १९५९ रोजी लद्दख हद्दीत भारत तिबेट सीमेवर १६ हजार फुट उंचावर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० शिपाई गस्त घालत असताना ‘हिंदी-चिनी भाई भाई’ असा नारा लावणाºया चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला. याची चाहूल लागताच सीमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रे असल्याची पर्वा न करता जवानांनी मातृभूमीसाठी प्राणपणाने लढून हौतात्म्य पत्करले. याच्यावर पोलिस इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना घडली त्या हॉट्रस्प्रिंग येथे या वीरांचे स्मारक उभारले आहे. तेव्हापासुन हा दिवस पोलिस हुतात्मादिन म्हणुन पाळला जातो. तेथे संपुर्ण भरतातील पोलीसांनी या विराचे स्मारक उभारले आहेत. सदर प्रसंगी पोलीस अधिक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधिक्षक रश्मि नांदेडकर यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहीली व अग्नीशस्त्राव्दारे १२५ काडतूसांच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:00 IST
कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाºया वीर पोलीस जवानांची आठवण म्हणुन संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृतीदिन म्हणुन पाळला जातो.
हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांना श्रद्धांजली
ठळक मुद्देमार्गदर्शन : पोलीस मुख्यालयात हुतात्मा दिन