शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाच्या आरक्षणाला आदिवासी संघटनांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:04 IST

कमिटाचा निर्णय रद्द करा : आमदारांच्या निवासस्थानी जाऊन दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : धनगड व धनगर हे भिन्न आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली कमिटी त्वरित बरखास्त करावी व त्या कमिटीची कोणतीही शिफारस स्वीकारू नये. तसेच धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी कोणताही आदेश काढू नये, अशी मागणी करीत विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भोंडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिले आणि धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाला विरोध दर्शविला.

यावेळी ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबलचे सोपचंद सिरसाम, अखिल भारतीय आदिवासी युवा परिषदेचे विनोद वट्टी, आदिवासी हलबा / हलबी समाज कर्मचारी महासंघाचे हेमराज चौधरी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे नरेश आचला, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नरेश नैताम, मनीष उईके, श्यामराव गावळ, एम. आर. कळ्याम, राज कुलसुंगे, उमेश औरासे, रोयल काटेंगे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

धनगर समाजाच्या नेत्यांनी पंढरपूर येथे आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी बेमुदत उपोषण केले असताना त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून 'धनगर व धनगड' हे एकच असल्याचे म्हटले आहे. यावर भंडारा जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. उच्च न्यायालय मुंबई, तसेच सर्वोच्च न्यायालयात धनगड (जमात) व धनगर (जात) हे या भिन्न जमाती व जाती असून धनगर या जातीला आदिवासींमध्ये समाविष्ट करता येणार नाही, असा स्पष्ट निकाल दिला. तरीही निवडणुकांवर डोळा ठेवून, मते मिळवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. असे झाल्यास आदिवासी समाजावर अन्याय होईल, असे या निवेदनात म्हटले आहे. 

.. तर आंदोलन राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे आदिवासी समाजावर अन्याय होणार आहे. सरकाने दखु न घेतल्यास या विरुद्ध आंदोलन उभारण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा