शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पैशाअभावी उपचार थांबले, आशा संपली; गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:38 IST

Bhandara : पोल्ट्री फार्मचे कर्ज थकल्याने तरुणाने संपविले जीवन

लोकमत न्यूज नेटवर्कगोबरवाही/लाखांदूर : जिल्ह्यात एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत चिखली (ता. तुमसर) येथील तरुणाने पोल्ट्री फार्मचे कर्ज थकल्याने जीवन संपविले, तर दुसऱ्या घटनेत राजनी (ता.लाखांदूर) येथील शेतकऱ्याने कर्ज आणि आजारापणाला कंटाळून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांमध्ये गळफास हे साम्य आहे.

लाखांदूर तालुक्यातील राजनी येथील लक्ष्मण नामदेव ठाकरे (५८) या शेतकऱ्याला एका असाध्य आजाराने ग्रासले. या आजारावर औषधोपचार करण्यासाठी कुटुंबीयांनी गावातील बचत गटासह काही नातलगांकडून हात उसने पैसे घेतले होते. मात्र, आजार बरा होत नसल्याने मागील काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या या शेतकऱ्याने आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तो पत्नी, मुलगा, सून व नातवंडांसह एकत्रित कुटुंबाने राजनी येथे राहत होता. औषधोपचार करूनही आजार बरा होत नसल्याने ते चिंतेत होते. डॉक्टरांनी पुन्हा उपचार करणे आवश्यक असल्याचे सांगितल्याने पुन्हा खर्च लागणार होता. मात्र, आता तेवढी ऐपत नसल्याने ते अधिकच खचले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास पत्नी व सून शेतावर गेले होते, नातवंड शाळेत तर मुलगा सेंट्रिंगच्या कामावर गेला होता. घरी कोणी नसल्याचे पाहून लक्ष्मण यांनी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याbhandara-acभंडारा