शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद शाळेचे पालटले रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 5:00 AM

गावातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांनी शाळेचा कायापालट केला आहे. दीड वर्षापुर्वी रूजू झालेले मुख्याध्यापक केशर मासूरकर यांनी आपल्या सहकारी शिक्षक अविनाश नगरकर, युवराज सैय्याम, सुरेश बावणे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत असणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा निश्चय केला.

ठळक मुद्देलाखनी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथील शाळा, ११० वर्षांच्या प्रवासाची ठरली साक्षीदार

चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथील लाखनी पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आधुनिक शाळेत रूपांतर झाले आहेत. ब्रिटीश कालखंडात इ.स. १९१० मध्ये स्थापन झालेल्या मुरमाडी तुप. येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याने ही शाळा स्पर्धेच्या युगात डिजिटलायझेशन झाली असल्याने मुरमाडी तुपकरचा नाव लौकीक वाढला आहे.गावातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांनी शाळेचा कायापालट केला आहे. दीड वर्षापुर्वी रूजू झालेले मुख्याध्यापक केशर मासूरकर यांनी आपल्या सहकारी शिक्षक अविनाश नगरकर, युवराज सैय्याम, सुरेश बावणे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत असणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा निश्चय केला. आणि शाळेला बदलण्याचा ध्यास घेतला. तेव्हापासून मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेत गावासह परिसरातील शिक्षणप्रेमी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शाळा विकासाबाबत चर्चा केली.हळूहळू गावकºयांसह पदाधिकाऱ्यांचा वाढता सहभाग आणि पालकांच्या मदतीने शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जावू लागले. शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी दर महिन्याला पालक सभा घेतली जाते. पालक सभेत विद्यार्थ्यांच्या विकासाचा आढावा तसेच चुका दाखवून दिल्या जातात. विद्यार्थ्यांना बालवयातच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी यासाठी इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करून दर शनिवारी परीक्षा घेतली जाते.विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण देवून गरजेचे नाही तर व्यवहाराचेही धडे देण्यासाठी शाळेत दीड वर्षापुर्वी विद्यार्थी बचत बँक सुरू करण्यात आली. या बचत बँकेतून विद्यार्थ्यांनी आतापर्यंत दोन लाख रूपये जमा केले आहेत. विद्यार्थ्यांना परिसरातील उद्योगधंदे, सहकारी संस्था, पर्यावरणाची माहिती मिळावी यासाठी प्रात्यक्षिकांच्या भेटी आयोजित केल्या जातात. शाळेत एक पशस्त सुशोभित इमारत उभी असून शाळेत बोलक्या भिंती, डिजिटल वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा अशा विविध सुविधांयुक्त शाळा असल्याने विद्यार्थी शाळेत रमत आहेत. याशिवाय शाळेत परिसर भेट, परसबाग, स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी, परीपाठ उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध नवनवीन प्रयोग राबविले जात असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीने राघवेंद्र निरगुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा