लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : धानाची पोती घरी नेत असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीखाली दबून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जमनापूर शिवारात मंगळवारी सायंकाळी घडली. मुकेश घोरमारे (२५) रा.जमनापूर असे मृत तरुणाचे नाव आहे.ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३६ - एल ६२३७ ने सकाळी सेंदूरवाफा येथे धानाने भरलेली पोतीे नेली होते. सायंकाळी तांदूळ घरी आणत असताना ट्रॅक्टरट्रॉली उलटली. मुकेश हा तांदळाच्या पोतींवर बसला होता. ट्रॉली उलटली तेव्हा राकेशने खाली कुदण्याचा प्रयत्न केला. मात्र मुकेश ट्रॉलीखाली दबला व त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहचली व त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॉली उचलून मुकेशचे प्रेत बाहेर काढून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे शवविच्छेदनासाठी आणले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ट्रॅक्टर उलटून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:52 IST
धानाची पोती घरी नेत असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीखाली दबून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जमनापूर शिवारात मंगळवारी सायंकाळी घडली. मुकेश घोरमारे (२५) रा.जमनापूर असे मृत तरुणाचे नाव आहे.
ट्रॅक्टर उलटून तरुणाचा मृत्यू
ठळक मुद्देजमनापूर शिवारातील घटना : साकोली पोलिसात घटनेची नोंद