कोंढा कोसरा : भंडारा - पवनी निलज राज्यमार्गावर व कोंढा परिसरात वाहतूक शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची दबंगशाही वाहनधारकास मोठी डोकेदुखी ठरली आहे.राज्यमार्ग क्र. २७१ यावर दररोज हजारो ट्रक, मेटॅडोर, काळी पिवळी, सुमो अशी वाहने धावत असतात. भंडारा येथील वाहतूक शाखेत कार्यरत दोन पोलीस कर्मचारी या मार्गावर सकाळी ६ वाजतापासून एका पल्सर मोटारसायकल गाडीने गस्त घालतात. पण कुठेही ट्रक, लक्झरी, काळी पिवळी, मेटॅडोर प्रवासी गाडीला अडवून त्यांच्याकडून १०० रुपयापासून ५०० ते १००० रुपयापर्यंत वसुली करीत असल्याची माहिती आहे. कोणतीही पावती न देता वाहनचालकाकडून अवैध वसुली करीत असल्याची तक्रार वाहनधारकांनी केली आहे. ट्रक, मेटॅडोर, महिंद्रा पिकअप व लग्न वऱ्हाडी घेऊन जाणारे वाहन हे त्यांचे जास्त लक्ष आहे. राज्य मार्गावर गस्त घालण्यासाठी त्यांचे काम आहे. अवैध प्रवासी वाहतूक असल्यास किंवा क्षमतेपेक्षा जास्त माल गाडीत असेल तर चालान फाडणे आवश्यक असताना वाहनधारकांकडून रुपये वसुल करीत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.कोंढा परिसरातील पिकअप व प्रवासी वाहनधारक, लग्न वऱ्हाड्यांना नेणारे वाहनधारक हे या पोलिसांच्या दबंगशाहीमुळे त्रस्त आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. लग्न, सगाई हे आनंदाचे क्षण असतात. ‘तेव्हा आम्हाला खुश’ करावयास हवे अशी त्यांची समजूत आहे. अशा दबंगशाही करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी आहे. (वार्ताहर)
वाहतूक पोलिसांची दादागिरी
By admin | Updated: April 20, 2016 00:56 IST