शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

पर्यटक म्हणतात, कोका अभयारण्यात ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीच्या काळात मी पुन्हा येईल हा शब्द अगदी परवलीचा झाला होता. राजकीय नेत्यांकडून याचा उच्चार वारंवार झाला. सोशल मीडियावरही हे वाक्य वारंवार पाहायला मिळाले. त्यामुळे आता कोणत्याही प्रसंगात मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, असे गमतीने का होईना म्हटले जात आहे. याचाच प्रत्यय ठिकठिकाणी येत आहे.

ठळक मुद्देअभिप्राय पुस्तिकेत केली नोंद । राजकीय घडामोडींचा पर्यटनावर प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’ हे वाक्य विधानसभेच्या निवडणुकीत राज्यभर गाजले. राजकीय घडामोडींचा जनमानसांवर कसा परिणाम पडतो याचे उत्तम उदाहरण कोका अभयारण्यातील अभिप्राय पुस्तिकेत दिसून आला. अभयारण्यातील वनवैभव पाहून तृप्त झालेल्या एका पर्यटकाने चक्क चालू राजकीय घडामोडीवरच अगदी मोजक्या शब्दात आपला शेरा नोंदविला.विधानसभा निवडणुकीच्या काळात मी पुन्हा येईल हा शब्द अगदी परवलीचा झाला होता. राजकीय नेत्यांकडून याचा उच्चार वारंवार झाला. सोशल मीडियावरही हे वाक्य वारंवार पाहायला मिळाले. त्यामुळे आता कोणत्याही प्रसंगात मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, असे गमतीने का होईना म्हटले जात आहे. याचाच प्रत्यय ठिकठिकाणी येत आहे. कोका अभयारण्याला एका पर्यटकाने भेट दिली. अलीकडे कोका अभयारण्य व्याघ्र दर्शनाने चर्चेत येत आहे. येथील वनवैभव कुणालाही मोहित करणारे आहे. जंगल सफारी करून आल्यानंतर पर्यटकांना अभिप्राय पुस्तकात शेरा लिहिण्याची विनंती केली जाते. अभयारण्याबद्दल काय वाटले हे लिहिणे अपेक्षित असते. एका पर्यटकाने जंगल सफारी करून दिलेला अभिप्राय कोका अभयारण्याच्या वैभवात खऱ्या अर्थाने भर घालणाराच म्हणावा लागेल. ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’ असा शेरा लिहून सदर पर्यटकाने अगदी मार्मिक शब्दात कोका अभयारण्याचे वर्णन केले. हा शेरा आता चर्चेचा विषय झाला.भंडारा जिल्ह्यात कोका अभरण्यातील निर्मिती १८ जुलै २०१३ रोजी करण्यात आली. शंभर चौरस किमीवर पसरलेल्या या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, चांदी अस्वल असे वन्यजीव आहेत. सुमारे हजार प्रजातीच्या वनस्पती असून नैसर्गीक तलाव आहेत. जागो जागी डोंगरदºया असून पर्यटकांसाठी वन्यजीव विभागाने येथे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. दररोज सकाळी आणि दुपारी जंगल सफारीचे आयोजन केले जाते. गत आठवड्यात दोनदा व्याघ्र दर्शन झाल्याने हे अभयारण्य आता चर्चेत आले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग