शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

गुलाबी थंडीत फुलू लागली भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 10:54 IST

भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील निसर्गरम्य, मनमोहक पर्यटनस्थळाला पर्यटक रोज मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक वारसा व वन्य प्राण्यांच्या दर्शनासाठी गर्दी

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील निसर्गरम्य, मनमोहक पर्यटनस्थळाला पर्यटक रोज मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.भेट देत असलेल्या पर्यटनस्थळात विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण, रुयाड येथील पञ्ञा मेत्ता आंतरराष्ट्रीय स्तराचा महासमाधीभूमी महास्तूप, पवनीतील ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायक यापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर व उमरेड कºहांडला, पवनी वन्यजीव अभयारण्य आदी पर्यटनस्थळाचा समावेश आहे.पवनीपासून १२ किलोमिटर अंतरावर विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटते. धरणाच्या ३३ भव्य वक्रद्वारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत.पवनी पासून ३ किलोमिटर अंतरावरील रुयाड (सिंदपुरी) येथील पञ्ञा मेत्ता संघ द्वारा निर्मित महासमाधीभूमी महास्तूप भारताच्या स्थापत्त्य क्षेत्रात नाविण्यपूर्ण ठरला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तराच्या महास्तुपाच्या निर्मितीमुळे देश विदेशामध्ये भंडारा जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. शांतीचा संदेश देणारा हा महास्तूप भारत जपानच्या मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महाखुण मधील सम्यक संबुद्धाची ४० फुट उंच मूर्ती भव्य शांत सभागृहात मनाला शांती देते.पवनी हे ऐतिहासिक व प्राचीन शहर आहे. पवन राजाने या शहराला वसविले. ही त्यांची राजधानी होती. प्राचीन काळात पवनी अत्यंत वैभवशाली शहर म्हणून प्रसिद्ध होते. मौर्य, वाकाटक, शृंग, सातवाहन, यादव काळात हे शहर प्रगत होते. या शहरावर यादव, गोंड, भोसले राजांनी राज्य केले. यादवानंतर चंद्रपूरच्या गोंड राजाने पवनी येथील डोंगरावर १५ व्या शतकात किल्ला बांधला. शहराच्या तीन बाजूला टेकड्यांवर तीन मैल किल्ला बांधला. नंतर १७ व्या शतकात भोसल्यांचे राज्य आले. परकोट सदृष्य किल्ल्यामधून बंंदूका, तोफामधून गोळ्या मारण्याचे छिद्रे आहेत.हा किल्ला ऐतिहासिकतेची साक्ष देत आजही उभा आहे. पूर्व विदर्भाची काशी व मंदिराचे शहर म्हणून ओयखल्या जाणाऱ्या पवनीमध्ये विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या मंदिरातील पंचमुखी गणेशाची प्रतिमा ही १० व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. एका शिळास्तंभावर चारही बाजूला गणेशाची प्रतीमा कोरली आहे. पाचवी प्रतीमा नैऋत्य दिशेला कोरली आहे. शिळास्तंभाचा वरचा भाग ११ इंच गोलाकार आहे. ही प्रतिमा आकर्षक आहे. पर्यटक या मंदिरासोबतच टेंभ्येस्वामी मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, रांझी चा गणपती आदी मंदिरांनाही भेट देत आहेत. उमरेड कऱ्हाडला पवनी वन्यजीव अभयारण्यातील जंगल घनदाट व विस्तीर्ण आहे. या जंगलात वाघ, बिबटे, हरिण, सांबर, चितळ, निलगाय व अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. येथे मोठ्या संख्येत असलेले वाघ पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

टॅग्स :tourismपर्यटन