शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रीन टाइम सुसाट, तर तुम्हालाही आहे 'व्हिजन सिंड्रोम'चा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:30 IST

Bhandara : रात्री उशिरापर्यंत मोबाइलचा वापर डोळ्यांसाठी घातक

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मोबाइल बघितल्याशिवाय तरुणांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. मोबाइलवर तासन् तास वेळ घालवल्यानंतर दिवसभर संगणकावर काम सुरू राहते. सतत संगणक व मोबाइल स्क्रीनकडे पाहिले जाते. रात्री उशिरा देखील डोळा लागेपर्यंत नजर मोबाइलच्या स्क्रीनकडेच असते. परिणामी तरुणांसह लहान मुलांमध्येही मोबाइल सिंड्रोमचे प्रमाण वाढत असून, कमी वयात चष्मा लागणे तसेच डोळ्यांशी निगडित आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती आहे.

कार्यालयीन कामकाजामुळे दिवसभर ऑनस्क्रीन असलेला तरुण तरुणींचा एक वर्ग आहे, तर दुसरीकडे मोबाइल स्क्रीनवर तासन् तास वेळ घालवणाराही वर्ग आहे. गेमिंग, व्हिडीओ कॉलिंग, चॅटिंगमध्ये हा वर्ग तासन् तास ऑनस्क्रीन व्यस्त आहे. फक्त तरुण-तरुणीच नव्हे, तर हल्ली सर्वच वयोगटांतील व्यक्ती उशिरापर्यंत मोबाइलचा वापर करतात. मात्र स्मार्टफोन्सचा अतिवापर, विशेषतः रात्रीच्या वेळी केला जाणारा वापर हा दृष्टीसाठी अत्यंत अपायकारक असतो, परंतु बहुतांश जण याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. 

मोबाइलच्या अतिवापराचे परिणाम डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे कोरडे होणे, लाल होणे, दुखणे, चष्मा लागणे, चष्याचा नंबर वाढणे

हे करून पाहा

  • सातत्याने स्क्रीनकडे नजर राहत असल्याने डोळे कोरडे पडतात. त्यामुळे डोळ्यांशी निगडित विविध समस्या उद्भवतात.
  • हे टाळण्यासाठी डॉक्टर २०-२०-२० फॉर्म्युला उपयोगी पडू शकतो. यामध्ये २० मिनिटे काम केल्यानंतर विश्रांती घ्या.
  • नंतर २० फूट दूर २० सेकंद बघा तासन् तास मोबाइल किंवा संगणक स्क्रीनवर राहणे डोळ्यांसाठी अपायकारक आहे.

ही घ्या काळजी

  • अधिक वेळ मोबाइल, संगणकाचा वापर टाळणे, स्क्रीनकडे सतत पाहावे लागत असेल, तर ३० मिनिटांनंतर डोळ्यांना आराम द्यावा. 
  • टेबल, खुर्चीवर बसून काम करणे. 
  • मोबाइल नजरेच्या अगदी जवळ धरून पाहू नये. 
  • डोळ्यांच्या त्रासावर स्वतःहून कोणतेही ड्रॉप वापरू नये.

"संगणक किंवा मोबाइल स्क्रीनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ह डोळ्यांसाठी घातक आहे. विशेषतः तरुणांसोबतच लहान मुलं रात्री उशिरापर्यंत मोबाइल स्क्रीनवरच असतात. त्यामुळे डोळ्यांशी निगडित विविध आजार उद्भवत आहेत. मुलांचा स्क्रीन टाइम कमी व्हावा, पालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे." - डॉ. योगेश जिभकाटे, नेत्ररोग तज्ज्ञ

टॅग्स :bhandara-acभंडारा