गोंदिया : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राज्याची माजी मंत्री आणि लोकमत समूहाचे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी (दि.२) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गोंदिया पब्लिक शाळा, पांगोळी नदी रोड, गोंदिया येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला गंगाबाई रक्तपेढीच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, कार्ड देवून अतिथींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नेहमीच रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे गरजूंना रक्तासाठी मोठीच धावपड करावी लागते. ही उणिव दूर करण्याचे उद्देश्य समोर ठेवून लोकमत समूह व बाई गंगाबाई रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे. सदर उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांसह लोकमतचे वाचक, सामाजिक संघटना व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय (०७१८२-२३०५०७), (९८८१०११८२१), (९८२३१८२३६७), (९४२३६८९६६४) येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर
By admin | Updated: July 2, 2015 00:38 IST