शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तंबाखूमुक्तीचा ‘बालहट्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:31 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाची उपाययोजना तोकडी पडली आहे.

ठळक मुद्देसरपंचांनी घेतली शपथ : ग्रामसभेत मांडणार तंबाखूमुक्त गावाचा ठराव

प्रशांत देसाई ।आॅनलाईन लोकमतभंडारा : तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाची उपाययोजना तोकडी पडली आहे. किंबहूना ती केलेली नाहीच असे दिसून येते. शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या गोजिरवाण्या बालकांनी गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी घेतलेला पुढाकार सर्वांना अंत:र्मुख करणारा आहे.लाखनी तालुक्यातील जेमतेम दोन हजार लोकसंख्येच्या सेलोटी गावात शालेय विद्यार्थ्यांनी हा पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने प्रशासनाने काय दखल घेतली आता हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांच्या हातात पाटी व पेन व खांद्यावर पुस्तकांचे दफ्तर असायला पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी गावाच्या आरोग्यासाठी तंबाखूजन्य प्रदार्थांच्या विक्रीवर बंदी आणावे व गावाला त्यापासून मुक्त करावे, यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीने अनेकांना आपल्या कवेत घेतले आहे. गावातून या विक्रीचे समुळ उच्चाटन व्हावे, यासाठी अन्य कुणी नाही तर शालेय विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला. त्यांनी गावतंबाखूमुक्त होण्यासाठी ग्रामपंचायतवर धडक दिली. यानंतर सरपंच देवनाथ निखाडे यांनी तंबाखूमुक्त गाव करण्याची शपथ विद्यार्थ्यांना दिली.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून एखादे गाव तंबाखूमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचा जिल्ह्यातील हा अभिनव पहिलाच प्रकार ठरला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना तंबाखू नियंत्रण जिल्हा समन्वय पुरुषोत्तम झोडे यांचे मार्गदर्शन लाभले. तंबाखूच्या आहारी गावातील आबालवृध्द गेल्याने गावात सर्वत्र खर्रापन्नी तसेच पान व खर्राच्या पिचकाºयांमुळे परिसर अस्वच्छ असल्याचे दिसून येते. मात्र तंबाखूमुक्त गावासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच यासाठी पुढाकार घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती ग्रामपंचायत पदाधिकारी यांना केली.विद्यार्थ्यांच्या अभिनव धडक मोहिमेचे सरपंच देवनाथ निखाडे, उपसरपंच भुपेंद्र गेडाम, सदस्य सतीश लांडगे यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी तातडीने गावात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभा बोलावून निर्णय घेण्याचे सरपंच व उपसरपंच यांनी विद्यार्थ्यांना आस्वस्थ केले. दरम्यान विद्यार्थ्यांसमोर सरपंच व उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी तंबाखू, गुटखा, खर्रा असे तंबाखूजन्य पदार्थ खाणे सोडत असल्याची प्रतिज्ञा घेतली. मुख्याध्यापक सुधाकर झोडे, शिक्षक अमरदिप गणविर, वंदना ठवकर, रिंगला लांडगे यांचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना मिळाले.विद्यार्थ्यांनी दिला अल्टीमेटमआम्हाला आमच्या घरी व गावात होणाऱ्या तंबाखू, खर्रा, गुटख्याच्या त्रासापासून वाचवा. आमच्या गावात व आमच्या स्वत:च्या घरी निरोगी वातावरण जगू द्या. त्यासाठी गावात तंबाखू, खर्रा, गुटखा विक्रीवर बंदी घाला. प्लास्टीकपन्नीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवा, कुठेही थुंकल्याच गावाची होणारी अस्वच्छता टाळा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवेदनातून केली आहे. शाळेतील विद्यार्थी या मागणीला घेवून चक्क ग्रामपंचायतवर धडकले. शालेय शिक्षणासोबतच या विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. ३० एप्रिलपर्यंत ही मागण्या पूर्ण करावी असा इशारा शालेय मंत्रीमंडळाने दिला आहे. अन्यथा १ मे पासून लोकशाही मार्गाने असहकार्य करण्याचा निर्णय शालेय बालकांनी दिला आहे.