मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने सरपंच पदाचे उमेदवार एका मंचावर हा कार्यक्रम काल १२ आॅक्टोबर रोजी महात्मा फुले विचार मंचावर आयोजित केला होता.सरपंच पदाचे उमेदवार मंचावर स्थानापन्न झाल्यावर आयोजकांकडून बॅचेस लावून त्यांचे स्वागत करण्यात आले व सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. आयोजकांनी प्रत्येक सरपंच पदाच्या उमेदवारांना आपला व आपल्या पॅनलचा परिचय करून देण्याची संधी दिली. तद्नंतर बॅलेट पेपरच्या क्रमानुार उमेदवारांना गावाच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांचे काय काय ध्येय धोरणे आहेत हे स्पष्ट करण्यास सांगितले व प्रत्येक उमेदवारांनी आपले आपले ध्येय धोरणे स्पष्ट केले.११ आॅक्टोबर रोजी गावातील वॉर्डा वॉर्डात शेतकरी मंडळाने ठेवलेल्या प्रश्नांच्या पाच स्थानामधील प्रश्न एकत्रित केल्यानंतर उमेदवारांवर प्रश्नांची सरबत्ती मंडळाच्या वतीने करण्यात आली. उमेदवारांवर गावातील जनतेने केलेले आरोप व त्यांची उत्तरे देताना झालेली दमछाक पाहूण उपस्थित जनतेने आयोजकांचे भरपूर कौतुक केले तसेच सदर कार्यक्रमाची व्हिडीओ रेकॉडिंग केली जात असल्याने प्रत्येक उमेदवाराने आश्वासनांची खैरात न वाटता जे कामे केली जाऊ शकतात असेच आश्वासने दिली. कार्यक्रमाचे संचालन एम. देशमुख यांनी केले तर आभार कोमल करंजेकार यांनी मानले.
प्रश्नांची उत्तरे देताना उमेदवारांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:26 IST
येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने सरपंच पदाचे उमेदवार एका मंचावर हा कार्यक्रम काल १२ आॅक्टोबर रोजी महात्मा फुले विचार मंचावर आयोजित केला होता.
प्रश्नांची उत्तरे देताना उमेदवारांची दमछाक
ठळक मुद्देदिघोरीत उपक्रम : सरपंचपदाचे उमेदवार एकाच मंचावर कार्यक्रम