शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यात बछड्यांसह व्याघ्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

पवनी तालुक्यालगत उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आहे. विविध प्रजातीचे वृक्ष असून डोंगराळ भाग व वनतलाव आहे. पर्यावरण प्रेमींसाठी अभयारण्य पर्वणी ठरत आहे. काही वर्षापूर्वी या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत होते. जय वाघाने तर जगभर या अभयारण्याला प्रसिद्धी मिळाली होती. आशिया खंडातील अत्यंत देखणा वाघ म्हणून त्याची प्रसिद्धी होती. त्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलीब्रिटींनी या अभयारण्याला भेट दिली होती.

ठळक मुद्देउमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य : लाॅकडाऊननंतर आले सुगीचे दिवस, पर्यटकांची संख्या वाढली

  अशोक पारधी लोकमत न्यूज नेटवर्कपवनी :  हमखास व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील जय वाघाच्या मृत्यूनंतर पर्यटकांनी पाठ फिरविली होती तर कोरोना संसर्गामुळे पर्यटकांना बंदी होती. आता या अभयारण्यात दोन बछड्यांसह एका वाघीणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. ऑनलाईन बुकींगलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. पवनी तालुक्यालगत उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आहे. विविध प्रजातीचे वृक्ष असून डोंगराळ भाग व वनतलाव आहे. पर्यावरण प्रेमींसाठी अभयारण्य पर्वणी ठरत आहे. काही वर्षापूर्वी या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत होते. जय वाघाने तर जगभर या अभयारण्याला प्रसिद्धी मिळाली होती. आशिया खंडातील अत्यंत देखणा वाघ म्हणून त्याची प्रसिद्धी होती. त्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलीब्रिटींनी या अभयारण्याला भेट दिली होती. मात्र तो अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर जयचंद व राहीने पर्यटकांना आकर्षित केले. परंतु एक-एक करीत सर्व वाघ नाहिसे झाले आणि पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरविली. तर कोरोनाच्या संसर्गाने एप्रिल महिन्यापासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद होते. त्यामुळे अभयारण्याच्या महसुलात मोठी घट झाली. तसेच पर्यटनावर उपजिवीका करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दिवाळीनंतर पर्यटकांसाठी अभयारण्य खुले झाले. परंतु सुरुवातीच्या काळात पर्यटकांचा फारसा प्रतिसाद दिसत नव्हता. आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दोन बछड्यांसह एक वाघीण पर्यटकांना दर्शन देत आहे. अनेक पर्यटकांना या वाघीणीचे दर्शन झाले. अलीकडे पवनी गेटवरुन प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना या वाघीणीचे नित्यनेमाने दर्शन होत आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकींगही जोमाने सुरु आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य १८९ चौरस किलोमीटर परिसरात पसरले असुन पवनी गेट अंतर्गत ५० चौरस किलोमीटर क्षेत्र येथे या अभयारण्यात विविध पशू पक्षी असून निसर्गाची मुक्त हस्ते उधळण आहे. वन्यप्राण्यांचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांसाठी पवनी गेट आकर्षणाचे केंद्र असते. मात्र पवनी गेटवर पर्यटकांसाठी फारशा सुविधा नाहीत. येथे केवळ बुकींग ऑफीस आणि विश्रांतीगृह आहे. त्याठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्याची खरी गरज आहे.

पवनी गेटला पर्यटकांची पसंतीउमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी गेटकडून जाणाऱ्या पर्यटकांना व्याघ्र दर्शन झाल्याने पर्यटकांची या गेटवरुन भ्रमंतीसाठी पहिली पसंती दिसत आहे. पवनी गेटवर बुकींग ऑफीस पर्यटकांसाठी विश्रांतीगृहाची सुविधा आहे. तसेच तेथे पर्यटनासाठी जीप्सीही उपलब्ध असते. दिवाळीच्या काळात एका पर्यटकाला बछड्यासह वाघीणीचे दर्शन झाले. या वाघीणीचा संचार कोरंभी, खापरी, पाहुणगाव या परिसरात दिसून आला. अलीकडे या वाघीणीचे अनेकांना दर्शन होत असल्याने पर्यटक पवनी गेटमधून प्रवेश करण्यासाठी उत्सूक असतात. पर्यटकांसाठी येथे आणखी सुविधा निर्माण केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्यातून रोजगाराची समस्याही सुटेल.

अभयारण्यात भ्रमंती करताना पर्यटकांनी वनविभागाच्या सर्व नियमांचे पालन करावे. वन्यजीवांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करु नये. वनभ्रमंतीत जीप्सीमधुन खाली उतरु नये. प्लास्टीकसह इतर साहित्य जंगलात फेकू नये.- आर.एम. घाडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)

 

टॅग्स :Tigerवाघforestजंगल