शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीच्या शेतात वाघाचा ठिय्या, नागरिकांची एकच गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:56 IST

मोहाडी तालुक्यातील मांडेसरची घटना

शिराज शेख

मोहाडी (भंडारा) : मिरचीच्या शेतात पट्टेदार वाघ ठिय्या मांडून असल्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे बुधवारी सकाळी उघडकीस आला. गावाात या घटनेची माहिती होताच वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. उपवनसंरक्षकांसह वनविभागचे पथकही दाखल झाले असून वाघाला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मांडेसर येथील बालचंद दमाहे यांच्या मिरचीच्या शेतात बुधवारी सकाळी ७ वाजता गावातील एका व्यक्तीला वाघ दिसला. घाबरून जाऊन तो झाडावर चढला. तेथूनच त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून गावात पाठविला. हा प्रकार माहित होताच गावकऱ्यांनी शेतातकडे धाव घेतली. शेतातील एक झुडुपात वाघ दिसला. नागरिकांच्या गोंगाटापे वाघ झुडुपातून बाहेर निघाला. मात्र घाबरून दुसऱ्या झुडुपात लपला.

याप्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली. उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांचा मोठा गोंगाट असल्याने वाघाला हुसकावून लावणे कठीण जात आहे. मोहाडी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले असून गावकरी मात्र तेथून हटायला तयार नाही. दुसरीकडे मिरचीचे संपूर्ण शेत गावकऱ्यांच्या पायाखाली तुडविले जावून नुकसान होत आहे.

गत पाच-सहा दिवसापासून या भागात वाघ असल्याची चर्चा आहे. या वाघाने वानर व रानडुकारची शिकार केल्याचे सांगितले जात आहे. मात्र बुधवारी प्रत्यक्ष वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मांडेसर शेतात वाघ असून आम्ही वाघाला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतील आहे. मात्र गावकऱ्यांची गर्दी असल्याने वाघ घाबरून लपून बसल आहे. पोलिसांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवून वाघाला शेतातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येतील.

- राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा

टॅग्स :Tigerवाघbhandara-acभंडारा