शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिबेटी महिलांचा राष्ट्रव्यापी शांती मार्च भंडारा शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:55 IST

दलाई लामानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तिबेटी धर्मगुरु अकराव्या पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी तिबेटीयन महिला असोसिएशनच्या वतीने राष्ट्रव्यापी पैदल शांती मार्च काढण्यात आला आहे. या शांती मार्चचे रविवारी भंडारा शहरात आगमन होताच स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देउत्स्फूर्त स्वागत : पंचेन लामांची चीनच्या ताब्यातून सुटकेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दलाई लामानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तिबेटी धर्मगुरु अकराव्या पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी तिबेटीयन महिला असोसिएशनच्या वतीने राष्ट्रव्यापी पैदल शांती मार्च काढण्यात आला आहे. या शांती मार्चचे रविवारी भंडारा शहरात आगमन होताच स्वागत करण्यात आले.नागपूरवरुन निघालेल्या या शांतीमार्चचे भंडाराच्या सीमेत नागपूर नाक्याजवळ आगमन होताच भारत-तिबेट मैत्री संघाचे राज्य महासचिव अमृत बन्सोड यांनी स्वागत केले. त्यानंतर हा शांती मार्च राष्ट्रीय महामार्गाने त्रिमुर्ती चौकात पोहोचला. त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याठिकाणी नगर परिषद उपाध्यक्ष आशु गोंडाणे यांनी मार्चमध्ये सहभागी सर्वांना शीतपेयाचे वितरण केले.या मार्चमध्ये ओरिसा, छत्तीसगड व महाराष्टÑातील ८५ तिबेटी महिला सहभागी झाल्या आहेत. या मार्चचे नेतृत्व अशोसिएशनच्या सचिव डोलमा त्सिरींगकरित आहे. नागपूर ते रायपूर असा हा मार्च जाणार आहे. याच पध्दतीचा मार्च देशाच्या अन्य ठिकाणाहून म्हणजे धर्मशाळा ते चंदीगढ, देहराडून ते दिल्ली, गंगटोक ते सालूगाठा आणि मैसूर ते बंगलोर असा निघाला आहे.भंडारा शहरात या मार्चचे स्वागत प्रसंगी मैत्री संघाचे अमृत बन्सोड, नगर उपाध्यक्ष आशु गोंडाणे, भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, गुलशन गजभीये, डी. एफ. कोचे, अहुजा डोंगरे, करण रामटेके, अशीत बागडे, मोरेश्वर गेडाम, अर्जुन गोडबोले, नगरसेवक कैलाश तांडेकर, विकास मदनकर, नितीन धकाते, मनोज बोरकर, एम.डब्ल्यू दहिवले, अ‍ॅड. डी. के. वानखेडे, प्रशांत देशभ्रतार, राजेश टिचकुले, मिलिंद मदनकर, डॉ. शैलेश मेश्राम, मयुर बिसेन, भुपेश तलमले, संतोष त्रिवेदी, राहूल मेश्राम, मुन्ना नागोरी, अजीज शेख आदी उपस्थित होते.ठावठिकाणा सांगण्यास चीनचा नकार१९९५ मध्ये दलाई लामा यांनी सहा वर्षाचे बालक ग्येदून च्योकी नीमा यांची अकरावे पंचेन लामा म्हणून घोषणा केली. मात्र चीनने त्यांना पंचेन लामा मानण्यास नकार दिला. एवढेच नाही तर अज्ञात स्थळी डांबून ठेवले. सहा वर्षाचे असतांना चीनने अटक केलेले पंचेन आता ३० वर्षांचे झाले आहे.