शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

तिबेटीयन दुचाकी रॅली भंडाऱ्यात दाखल

By admin | Updated: October 11, 2016 00:32 IST

भारत सरकारने चीनशी सकारात्मक बोलणी करावी या उद्देशाने कर्नाटकातील बेलकुप्पी या तिबेटी निर्वासीत ...

जल्लोशात स्वागत : बाईकस्वार करणार ३२ हजार किमीचा प्रवासभंडारा : भारत सरकारने चीनशी सकारात्मक बोलणी करावी या उद्देशाने कर्नाटकातील बेलकुप्पी या तिबेटी निर्वासीत वसाहतीतील युवकांनी बाईक रॅलीतून जनजागृती सुरु केली आहे. हे बाईकस्वार युवक भंडारा शहरात दाखल झाले. त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. चीनने तिबेटला पुर्ण स्वातंत्र देण्याऐवजी स्वायत्ता देण्याकरिता मध्यम मार्गाचा अवलंब करुन दलाईलामा व निर्वासीत तिबेट सरकारच्या प्रतिनिधीशी चर्चा करावी. युनोने चीनद्वारा तिबेटमध्ये गंभीररित्या सुरु केलेल्या मानवाधिकाराचे हणन, पर्यावरणाचा विनाश व सर्व राजकीय कैद्यांची सुटका करावी म्हणून चीनला समज द्यावी तसेच चीनच्या माध्यमातून तिबेटीयन नागरिकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात १४४ तिबेटीयन लोकांनी केलेल्या आत्मदहनाची दखल घेवून भारतीय नागरिकांनी भारत सरकारवर दबाव आणावा व भारत सरकारनी चीनशी सकारात्मक बोलणी करावी या उद्देशाने ही बाईक रॅली काढण्यात येत आहे.२ आॅक्टोंबरपासून सुरुवात झालेले ही बाईकरॅली ३२ हजार किलोमिटरचा टप्पा पुर्ण करीत १२ आॅक्टोंबरला हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे पोहचणार आहे. या मोटारबाईक रॅलीचे भंडारा शहरातील त्रिमुर्ती चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आगमन झाले. यावेळी भारत- तिबेट मैत्रीसंघातर्फे राज्य महासचिव अमृत बन्सोड, डी. एफ. कोचे, गुलशन गजभिये, असित बागडे, रुपचंद रामटेके, संजय बन्सोड, महादेव मेश्राम, एम. डब्ल्यू. दहिवले यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर वैशाली नगरातील बुध्द विहारात आयोजित समारंभात संस्थेचे अध्यक्ष महादेव मेश्राम, एम. डब्ल्यू दहिवले, वामन मेश्राम, ज्ञानेश्वर गजभिये, सुरेंद्र सुखदेवे, शकुंतला हुमणे, शकुंतला गजभिये, विशाखा वाहाणे आदींनी बाईकरॅलीतील युवकांचे स्वागत करुन पुढल्या प्रवेशाला शुभेच्छा दिल्या. मोटारबाईक रॅलीत कुनसांगदोरजी, नामगॅल डोलो, त्सीरीन झोनजन, त्येजिनत्सोनज्यू, तेजन त्सीरींग, सोनम, सोनम धांडूप यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन अमृत बन्सोड यांनी केले तर आभार एम. डब्ल्यू. दहिवले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)