शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

आमसभेत गदारोळ

By admin | Updated: February 26, 2015 00:26 IST

तुमसर पंचायत समितीच्या आमसभेत शिक्षण लघु पाटबंधारे विभाग तथा विद्युत विभागासह सर्वच खात्यावर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचासह लोकप्रतिनिधींचा रोष दिसला.

तुमसर : तुमसर पंचायत समितीच्या आमसभेत शिक्षण लघु पाटबंधारे विभाग तथा विद्युत विभागासह सर्वच खात्यावर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचासह लोकप्रतिनिधींचा रोष दिसला. शिक्षण विभागावर प्रश्नांचा भडीमार झाला. शालेय पोषण आहार व कामातील हयगय खपवून घेणार नसल्याचे आमदार वाघमारे यांनी आमसभेतून खडसावले. लघु पाटबंधारे विभागाचा आढाव्यात सिंदपूरी येथील तलाव फूटून वर्षे लोटले तरी अजूनपर्यंत प्रगती झाली नाही असा प्रश्न सरपंचाने उपस्थित केला. दोन विभागात या तलावाची वाट अधिकाऱ्यांनी लावली असा आरोप करण्यात आला. लघु पाटबंधारे विभाग जि.प. ० ते १०० हेक्टर पर्यंत सिंचनाचे तलाव जि.प. व १०० हेक्टर वर सिंचन होत असलेले तलाव लघू पाटबंधारे स्थानिक स्तर करतो. १ कोटी ८२ लाख येथे खर्च अपेक्षित आहे अशी माहीती ल.पा. च्या उपविभागीय अभियंत्यांनी दिली. गॉर्ज फिलींगला ४० ते ५० लाख खर्च अपेक्षित आहे. आ.चरण वाघमारे यांनी महत्वाची कामे त्वरीत झाली पाहीजे दोन विभागाचा फटका गावकऱ्यांना बसता कामा नये असे आदेश देऊन नविन प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला. राज्य सरकारचे उपविभागीय अभियंता आमसभेत गैरहजर होते याची दखल आमदार वाघमारे यांनी घेतली.शिक्षण विभागाचा आढावा सुमारे एक तास घेण्यात आला. जि.प. शाळेत शिक्षकांची रिक्त पदे ३७ ाहेत. शिक्षक गैरहजर राहणे यांच्या तक्रारी सरपंच व उपसरपंचानी केल्या. शालेय पोषण आहारात सतर्कता बाळगण् याची गरज असून मुख्याध्यापकासह गटशिक्षणाधिकारी अडचणीत येतील अशी समज आ.वाघमारे यांनी दिली. चांदपूर येथील शाळेत सातवीच्या विद्यार्थ्याला गावाचे नाव इंग्रजीत लिहीता आले नाही. गुणवत्ता विकास केवळ कागदोपत्री आहे. शालेय पोषण आहार संदर्भात पत्र पाठविण्यात आले त्या पत्राचे उत्तर गटशिक्षणाधिकारी सी.आर. नंदनवार यांनी दिले नाही. वीज वितरण कंपनीच्या विरोधातही सरपंच व उपसरपंचानी तक्रारी मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांना समस्या त्वरीत निकाली काढण्याचे निर्देश आ.वाघमारे यांनी दिले. देव्हाडी येथील कनिष्ठ अभियंता गवते यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याच्या सूचना दिल्या. सर्वच विभागावर लोकप्रतिनिंचा रोष दिसून आला. आमसभेला जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, उपाध्यक्ष रमेश पारधी, सभापती संदीप टाले, पंचायत समिती सभापती कलाम शेख, उपसभापती वासुदेव वाडीभस्मे, खंडविकास अधिकारी स्नेहा कुळचे, तहसीलदार सचिन यादव, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव कहालकर, अशोक उईके, राजेश पटले, पंचायत समितीचे सर्व सदस्य, सर्व विभाग प्रमुख यांच्यासह परिसरातील ग्रामस्थही उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)