वाहतूक परवान्यापेक्षा अधिक प्रमाणात सागवान लाकडांची वाहतूक करणारे तीन ट्रक वनविभागाच्या फिरत्या पथकाने पकडले. शनिवारी सकाळपासूनच सागवान लाकडांची मोजणी सुरू आहे. यातील दोन ट्रक गडेगाव डेपो येथे जमा करण्यात आले तर तिसरा ट्रक कारधा तपासणी नाक्यावर आहे. जप्त करण्यात आलेल्या सागवन लाकडाची किंमत ३० लाखांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
मौल्यवान सागवान लाकडांसह तीन ट्रक जप्त
By admin | Updated: December 13, 2015 00:35 IST