शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीचे तीन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 21:29 IST

१४ ऑगस्ट रोजी भंडारा पोलीस ठाणे अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहरु वॉर्ड मेंढा येथे राहणाऱ्या कैलास उर्फ टपोरी सुखदेव मुटकूरे याची तपासणी करण्याकरिता पोलीस पथक पोहोचले. पोलिसांना पाहून तो पळू लागल्याने त्यावर संशय बळावला. त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने हत्तीडोई येथे अन्य दोघांच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले.

ठळक मुद्देडीबी पथकाची कार्यवाही : हत्तीडोई येथे केली होती चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील हत्तीडोई येथे घरफोडी करुन सोन्या-चांदीच्या ऐवजांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या तीन आरोपींना डीबी पथकाने अटक केली. विशेष म्हणजे १४ ऑगस्ट रोजी घडलेल्या एका चोरीच्या प्रकरणात तपासणीसाठी गेलेल्या पोलीस पथकाला बघीतल्यावर त्यातील एकाने पळ काढला. यावरुनच हत्तीडोई व अन्य ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीला आले.१४ ऑगस्ट रोजी भंडारा पोलीस ठाणे अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहरु वॉर्ड मेंढा येथे राहणाऱ्या कैलास उर्फ टपोरी सुखदेव मुटकूरे याची तपासणी करण्याकरिता पोलीस पथक पोहोचले. पोलिसांना पाहून तो पळू लागल्याने त्यावर संशय बळावला. त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने हत्तीडोई येथे अन्य दोघांच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले. यात त्याला अभिषेक उर्फ पांग्या रामभाऊ चंदनबटवे, सुनील उर्फ गुड्डू सोमाजी उरकुडे दोन्ही रा. मेंढा यांना ताब्यात घेतले. जून महिन्यात हत्तीडोई येथे घरफोडी केली होती. याशिवाय भंडारा येथील ग्रामसेवक कॉलोनीत चोरी करुन दहा हजारांचा ऐवज तर तुलसीनगरात रात्री दरम्यान घरफोडी करुन १३ हजारांची रोख रक्कम व शास्त्री नगर परिसरात एका घरात चोरी करुन ३० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिणे चोरल्याचे कबूल केले.तिघांकडून २ लक्ष पाच हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, एसडीपीओ रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे, पीएसआय अमरदीप खाडे, हवालदार श्रीवास, भुसावळे, प्रशांत भोंगाडे, साजन वाघमारे, शिपाई अजय कुकडे, भेनाथ बुरडे, संदिप बन्सोड यांनी केली.

टॅग्स :Thiefचोर