शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोमानियाच्या विमानतळावर तीन, तर हंगेरीच्या सीमेवर दोन विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत महाव्यवस्थापक असलेले अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या युक्रेनमधील पोलंड सीमेवर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हर्षित आता हंगेरीच्या सीमेवर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच हर्षित हा लॅव्हिव्ह शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता; परंतु युद्ध सुरू झाल्याने तो तिथेच अडकला. ऑडिओ क्लिप पाठवून त्याने भयानक वास्तव स्थिती काय आहे याबाबत आई-वडिलांना सांगितले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगत युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचा जीव अजूनही टांगणीला आहे. यातच जिल्हा प्रशासनाने बुधवारी भंडारा जिल्ह्यातील युक्रेनमध्ये गेलेल्या पाचही विद्यार्थ्यांची यथापरिस्थिती सांगितली असून, तीन विद्यार्थी रोमानियाच्या विमानतळावर, तर दोन विद्यार्थी हंगेरीच्या सीमेवर असल्याची माहिती दिली आहे. यात हर्षित चौधरी व विनोद ठवकर हे दोघे विद्यार्थी हंगेरीच्या सीमेपर्यंत पोहोचले आहेत, तर श्रेयश निर्वाण, निकिता भोजवानी व प्रीतेश पातरे रोमानियाच्या विमानतळावर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. रशिया व युक्रेनमध्ये युद्धाची सुरुवात हाेऊन आठवडाभराचा कालावधी झाला आहे. भारतातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत महाव्यवस्थापक असलेले अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या युक्रेनमधील पोलंड सीमेवर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हर्षित आता हंगेरीच्या सीमेवर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच हर्षित हा लॅव्हिव्ह शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता; परंतु युद्ध सुरू झाल्याने तो तिथेच अडकला. ऑडिओ क्लिप पाठवून त्याने भयानक वास्तव स्थिती काय आहे याबाबत आई-वडिलांना सांगितले होते. भंडाऱ्यातील साई मंदिर परिसरातील रहिवासी असलेल्या धीरज पात्रे यांचा मुलगा प्रीतेश हा एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेला आहे. तो सध्या रोमानियाच्या विमानतळावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यासोबतच श्रेयश व निकिताही त्याच विमानतळावर असल्याचे सांगितले आहे. विनोद ठवकर हा विद्यार्थीसुद्धा हंगेरी देशाच्या सीमेपर्यंत पोहोचल्याचे सांगितले. 

पालकांची चिंता संपेना- जोपर्यंत काळजाच्या तुकड्याला आपल्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत आमच्या जिवात जीव नाही. युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण होत असतानाच त्यांना परत यावे, असे म्हटले होते. मात्र, विद्यार्थ्यांवर दबाव आल्याने ते मायदेशी परतू शकले नाहीत. आता प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले आहे. अशातच मंगळवारी कर्नाटक राज्यातील रहिवासी असलेल्या नवीन नामक विद्यार्थ्याचा बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेने पालकांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. केव्हा एकदा आपला चिमुकला घरी परततो याचीच या पालकांना चातकासारखी प्रतीक्षा आहे.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी