शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोडाऊनअभावी हजारो क्विंटल धान केंद्रावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

गतवर्षी शेतकऱ्यांना धानाचा काटा (मोजणी) करण्याकरीता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली नव्हती. धानाचा काटा होवून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळाले होते. परंतू यावर्षी शासनाच्या विविध अटी व शर्तीमुळे धान खरेदी केंद्र अडचणीत सापडले. शासनाच्या निर्देशानुसार धान खरेदी केंद्रांनी धान खरेदीकरीता डीजिटल सातबाराची अट समोर केली. अनेक शेतकऱ्यांना वेळेत डिजीटल सातबारा तयार मिळाला नाही.

ठळक मुद्देपर्याप्त गोडावूनची व्यवस्था करा : धानाचे काटे केव्हा होणार, शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी(पालोरा) : धानाची कापणी व मळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी करडी, पालोरा, मुंढरी धान खरेदी केंद्रावर धान आणून ठेवले आहेत. परंतू पर्याप्त गोडाऊन अभावी हजारों क्विंटल धान्य केंद्रावर पडून आहेत. अजुनही धानाचा काटा सुरू झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. धानाची मोजणी झालेली नसल्याने दैनदिन खर्च, मुला-मुलीचा लग्न व अन्य खर्चासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गतवर्षी शेतकऱ्यांना धानाचा काटा (मोजणी) करण्याकरीता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली नव्हती. धानाचा काटा होवून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळाले होते. परंतू यावर्षी शासनाच्या विविध अटी व शर्तीमुळे धान खरेदी केंद्र अडचणीत सापडले. शासनाच्या निर्देशानुसार धान खरेदी केंद्रांनी धान खरेदीकरीता डीजिटल सातबाराची अट समोर केली. अनेक शेतकऱ्यांना वेळेत डिजीटल सातबारा तयार मिळाला नाही.त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू होवूनही १५ दिवस बंद राहीले. धानाचा काटाही करण्यात आलेला नव्हता. शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला होता. डिजिटल सातबारा अट रद्द करून तलाठी सातबारावर धान खरेदी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी करडीचे सरपंच महेंद्र शेडे यांनी रस्ता रोको आंदोलन उभारला होता. अखेर शासन-प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत तलाठी सातबारावर जुन्याच पद्धतीने धान खरेदी करण्यास परवानगी दिल्याने धान खरेदी सुरू करण्यात आली. परंतू ग्रामीण भागात उपलब्ध गोडावूनची क्षमता अत्यंत तोकडी असल्याने अल्पावधीत गोडावून भरले. त्यामुळे पुन्हा धानाचा काटे बंद करण्यात आले. शेतकऱ्यांची धान खरेदीसाठी ओरड वाढताच प्रशासनाने खरेदी केंद्र सुरू करून बाहेर धानाचा काटा केले जाईल व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले. परंतू गोडाऊनच नसल्यान खरेदी यंत्रणा बंद पडली आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष तेवुन गोडावूनची व्यवस्था करून देण्याची मागणी करडी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे यांनी केली आहे. जर गोडावूनची व्यवस्था होवून तात्काळ धानाचे काटे सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असाही ईशारा महेंद्र शेंडे यांनी दिला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड