शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:17 IST

Bhandara : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : मागील जुलै व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले. याप्रकरणी तालुक्यातील प्रशासनाअंतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र मागील २ महिन्यांपासून क्षतिग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप आहे. नुकसानभरपाई उपलब्ध करण्याच्या मागणीला घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठविले आहे. 

मागील २० ते २२ जुलै रोजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने झोडपून काढले होते. या अतिवृष्टीने तालुक्यातील तब्बल ८ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये तालुक्यातील १७ हजार १०८ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानप्रकरणी शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. तर ९ ते १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ८५३ शेतकऱ्यांचे ३०८ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले आहे. 

या दोन्हीप्रकरणी स्थानिक लाखांदूर तहसील प्रशासनांतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र पंचनाम्याची कारवाई होऊन जवळपास २ महिने लोटूनदेखील अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई उपलब्ध केली नाही. अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाल्याने हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष नरेश दिवठे, तालुका महासचिव गोविंदराव बरडे, दीपक चिमणकर, देवानंद नागदेवे, लोचन पारधी, दादा अलोणे, कारू भावे, ब्रह्मदास मेश्राम, राष्ट्रपाल लोणारे, खुशाबा गजभिये, अनिल पारधी, उमेश वनस्कर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती