शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

उघड्यावरील हजारो पोते धान ओलेचिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:01 IST

गत दोन दिवसांपासून कोसळल असलेल्या अवकाळी पावसाचा फटका आधारभूत केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसत आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावर हजारो पोते धान ओलेचिंब झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : लाखांदूर, पवनी, साकोली, तुमसर, मोहाडी तालुक्यात हजेरी, तूर पीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दोन दिवसांपासून कोसळल असलेल्या अवकाळी पावसाचा फटका आधारभूत केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसत आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावर हजारो पोते धान ओलेचिंब झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. बाजार समितीने धान झाकण्याची कोणतीही सुविधा न केल्याने शेतकºयात संताप व्यक्त होत आहे. यासोबतच अवकाळी पावसाचा फटका तूर आणि भाजीपाला पिकांना बसत आहे. आणखी दोन दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळपासून अवकाळी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. सोमवारी मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यात पाऊस बरसायला लागला. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दिवसाचे तापमान कमालीचे खाली आले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसत आहे. दिवाळीपासून सुरू झालेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेकडो शेतकºयांनी धानाचे पोते विक्रीसाठी आणले आहे. केंद्रावर पुरेशी जागा नसल्याने सर्वच ठिकाणी शेतकºयांनी उघड्यावर धान ठेवला आहे. रविवार आणि सोमवारी बरसलेल्या या पावसाने बहुतांश शेतकºयांचा धान ओला झाला आहे. अनेक शेतकºयांनी आपल्या घरून ताडपत्री आणून धान झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु धान ओलाचिंब झाला.लाखांदूरमध्ये दोन हजार धान भिजलाआमच्या लाखांदूर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात अचानक आलेल्या पावसाने बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेला धान भिजला आहे. सुमारे दोन हजार पोते पावसाने ओलिचिंब झाल्याने शेतकºयांचे ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तालुक्यात १२ ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. आधारभूत धान केंद्रावर कोणतीही सुविधा नाही. पुरेसे गोदामही नाहीत. त्यामुळे शेतकºयांना विक्रीसाठी आणलेले धान उघड्यावरच ठेवावे लागते. सोमवारी आलेल्या पावसाने संपूर्ण धान ओलाचिंब झाला. तालुक्यात सोमवारी पहाटे ३ वाजतापासून पावसाने हजेरी लावली. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. गहू, हरभरा आणि वटाना पिकाला याचा फटका बसणार आहे.साकोलीत सकाळपासून पाऊसआमच्या साकोली येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सोमवारी सकाळी ९ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. फुलोºयावर आलेल्या तुरीचे मोठे नुकसान होत आहे. ढगाळ वातावरणामुळे अळींचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे. यासोबतच तुमसर, मोहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. उघड्यावर असलेल्या धान ओला झाला.पवनी तालुक्यालाही पावसाचा फटका बसला असून आसगांव परिसरात सोमवारी सकाळी सात वाजतपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. गंजी मारून असलेल्या धानाचे नुकसान झाले. तर अड्याळ परिसरात झालेल्या पावसाने धानाची मळणी थांबली असून ऊस तोडही रखडली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आजार बळावण्याची शक्यता आहे. पालोरा चौरास परिसरात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. उघड्यावरील धान वाचविण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडत आहे. जागा अपुरी असल्याने आधारभुत केंद्रावर धान उघड्यावर ठेवण्यात आला आहे.चुल्हाड परिसरात धान पोते उघड्यावरसिहोरा येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर गेल्या महिनाभरापासून बारदान्याचा अभाव आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रखडली असून शेकडो शेतकºयांना धान उघड्यावर आहे त्यातच दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसापासून धान ओले झाले आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. सिहोरा येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर १० हजारावर पोते उघड्यावर आहे. शेतकरी ढगाळ वातावरणाने धान झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अनेक शेतकºयांचा धान ओला होत आहे. दि सहकारी राईस मिलचे अध्यक्ष गंगादास तुरकर म्हणाले, सिहोºयाचे धान खरेदी केंद्रावर बारनाण्याचा पुरवठा करण्यात आला नसल्याने प्रक्रिया रखडली आहे. शिवाय अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान होत आहे.पालांदूर परिसरात जोरदार पाऊसलाखनी तालुक्यातील पालांदूर परिसराला सोमवारी अवकाळी पावसाने सोमवारी झोडपून काढले. सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. उघड्यावर असलेला धान झाकण्यासाठी शेतकºयांची मोठी धावपळ झाली. रब्बी मशागतीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बागायती पिकांना या पावसाचा फटका बसत आहे. भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होत असून ढगाळ वातावरणात बुरशीजन्य रोग बळावण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसाने सर्वांची त्रेधा उडाली आहे. हाच पाऊस आवश्यकता असताना बरसला असता तर धान पिकाच्या उत्पन्नात वाढ झाली असती. परंतु आता गरज नसताना पाऊस बरसत असून निसर्गाच्या या अवकृपेचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. उत्पन्नात घट होण्याची यामुळे शक्यता आहे. शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले.सुविधा देण्यात बाजार समिती अपयशीआधारभूत केंद्रावर येणाºया धानाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी संबंधीत बाजार समितीची असते. द महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाने २२ आॅक्टोबर रोजी सर्व बाजार समितींना पत्र पाठवून सुविधा देण्याचे सांगितले होते. त्यामध्ये चाळणी, पंखे, ताडपत्री, पॉलिथिन शिट, ईलेक्ट्रानिक वजनमापे, आर्द्रतामापक यंत्र यासोबतच शेतकºयांच्या निवासाची व त्यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविण्याचे म्हटले होते. परंतु अवकाळी पावसाने बाजार समितीचे पितळ उघडे पाडले. बहुतांश केंद्रावर ताडपत्री नसल्याने शेतकऱ्यांचा धान ओला झाला. अनेक शेतकºयांनी आपल्या गावावरून ताडपत्री आणून धान झाकण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकºयांना मोठा फटका बसत आहे.आणखी दोन दिवस पावसाची शक्यताजिल्ह्यात आणखी दोन दिवस म्हणजे १२ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गत गाठ दिवसांपासून ढगाळी वातावरण आणि दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने नागरिक उबदार कपडे घालूनच बाहेर निघत आहे. ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाचा फटका शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना बसत असून हिवाळ्यात छत्री बाहेर काढावी लागत आहे.धान पडणार काळपटपावसाने ओला झालेला धान काळपट पडण्याची भीती आहे. आधारभूत केंद्रावर ओला झालेला धान वाळवावा लागणार आहे. त्यासाठी तो पुन्हा आपल्या गावी न्यावा लागेल. त्यासाठी आर्थिक भुर्दंड बसेल. धानाचे वजन कमी होवून कमी दर मिळतील.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड