शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वडिलांचा मित्र असल्याचे सांगून घरात शिरला अन् पळविले साडेतीन लाखांचे साेन्याचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 12:42 IST

भंडारा शहरातील सहकार नगर भागातील घटना, सहा वर्षांचा मुलगा हाेता घरी

भंडारा : दार ठाेठावून पप्पाचा मित्र आहे असे सांगत एका भामट्याने घरात प्रवेश केला. मुलाला चाॅकलेट दिले आणि अवघ्या दहा मिनिटात घरातून तीन लाख ७७ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने पळविले. ही घटना भंडारा शहरातील सहकार नगरात गुरुवारी (दि. २१) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार भंडारा ठाण्यात रात्री ११ वाजता देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चाेरट्याचा शाेध सुरू केला आहे.

लक्ष्मण चितुलाल कटरे (३९) यांच्याकडे भाड्याने राहत असलेल्या घरीत चाेरी झाली. ते मूळ गाेंदिया जिल्ह्यातील वघाेली येथील रहिवासी आहेत. येथील श्रीराम फायनान्स कंपनीत ब्रँच मॅनेजर असून, त्यांनी सहकार नगरातील सुधाकर भुरे यांच्याकडे भाड्याने राहतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कार्यालयात गेले. पत्नीने मुलाला शाळेतून आणले आणि त्या दुपारी १ वाजेच्या सुमारास ब्यूटिपार्लरच्या क्लाससाठी बाहेर गेल्या. त्यावेळी सहा वर्षाचा मुलगा विनय हा एकटाच घरी हाेता.

काही वेळात कुणीतरी दारावर थाप मारली. पप्पाचा मित्र आहे असे सांगितले. त्याने खिडकीतून बघितले तेव्हा कुणी दिसले नाही. त्यामुळे दार उघडले तेव्हा एक व्यक्ती दारात उभा हाेता. मी तुझा पप्पाचा मित्र आहे असे म्हणत घरात शिरला. त्याने विनयला चाॅकलेट दिले. विनयला साेफ्यावर बसण्यास सांगितले. त्याच्यासाेबत गप्पा मारत दार आतून बंद केले. बेडरूममध्ये जाऊन खिळ्याला लटकविलेल्या पर्समधून तीन लाख ७७ हजार ६६० रुपयांचे साेन्याचे दागिने लंपास केले.

काही वेळात विनयला संशय आला त्याने आरडाओरडा केला. भामटा पसार झाला. शेजारी धावून आले. तेवढ्यात आईही आली. घरात जाऊन बघतात तर चाेरी झाल्याचे लक्षात आले. पती लक्ष्मण कटरे यांना माहिती दिली. त्यांनीही घरी धाव घेतली. या घटनेची माहिती पाेलिसांना देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी रात्री ११ वाजता भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक कराळे करीत आहेत. 

मीटिंगमध्ये असल्याने वडिलांनी उचलला नाही फोन

लक्ष्मण कटरे हे श्रीराम फायनान्समध्ये ब्रॅन्च मॅनेजर असून त्यांची गुरुवारी बैठक होती. बैठक आटोपून ते २ वाजेपर्यंत घरी येणार होते; परंतु बैठक लांबली. विनयने घरी आलेल्या व्यक्तीची माहिती देण्यासाठी वडिलांना फोनही केला. परंतु, मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी फोनही उचलला नाही आणि इकडे चोरट्याने डाव साधला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीbhandara-acभंडारा