शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

ते आले, त्यांनी पाहिले अन् सर्वकाही जिंकले

By admin | Updated: March 13, 2016 00:36 IST

'अरे दिवानों मुझे पहचानो, कहा से आया मैं हूँ कौन' या गाण्याने सभागृहात प्रवेश करताच सखींची एकच गर्दी झाली.

ज्युनिअर अमिताभने केली धमाल अभिनय, नृत्य, काव्यवाचनाने कार्यक्रमाला बहारभंडारा : 'अरे दिवानों मुझे पहचानो, कहा से आया मैं हूँ कौन' या गाण्याने सभागृहात प्रवेश करताच सखींची एकच गर्दी झाली. भंडारा शहरातील वॉर्ड संयोजिकांनी गुलाबाच्या पाकळ्यांच्या वर्षावात ज्युनिअर अमिताभ यांचे स्वागत केले. भंडारा येथे लोकमत सखी मंचच्या वतीने महिला दिनानिमित्त शुक्रवारी शहरातील मुस्लिम लायब्ररी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटक ज्युनिअर अमिताभ, नागपूर येथील सखी संयोजिका नेहा जोशी, मनिषा रक्षिये, कार्यालय प्रमुख मोहन धवड, जिल्हा प्रतिनिधी नंदु परसावार यांच्या हस्ते करण्यात आले. सखी वॉर्ड प्रतिनिधी वैशाली झाडे यांनी 'इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारो है' या सुमधुर गिताने पाहुण्यांचे स्वागत केले.ज्युनिअर अमिताभ यांनी कार्यक्रमाला प्रारंभ करताच सखींनी एकच जल्लोष केला. मग काय? त्यांचे अभिनय, गायन, नृत्य व काव्य हुबेहुब अमिताभ बच्चन यांच्यासारखेच. त्यात भर म्हणजे सखींना प्रत्यक्षात त्यांच्यासोबत स्पर्धा खेळण्याची संधी सखींनी केली. सखींच्या आग्रहखातर अग्निपथ, दिवार, हम, शराबी, बागबान, शहंशाह, जंजीर, मोहबते या चित्रपटातील प्रसिद्ध गीत व संवाद त्यांनी यावेळी सादर केले. 'कजरा रे कजरा रे, रंग बरसे, खैके पान बनारस वाला, कभी कभी, पार्टी तो बनती है' आदी गाण्यांवर सखींनी त्यांच्यासोबत नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. जणू वाटले ते आले. त्यांनी पाहिले, अन् सर्वकाही जिंकले. यावेळी नेहा जोशी यांनी सखी, युवती व महिलांना सखी नोंदणीकरिता आवाहन केले. जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी वार्षिक कार्यक्रमा अहवाल दिला. त्यांनी लोकमत सखी मंच ब्रँड अ‍ॅम्बेसिडर चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच सखींच्या भेटीला येणार आहे. बिग इव्हेंट म्हणून निराली 'कुकरी शो' खास सदस्यांसाठी नि:शुल्क आयोजित करण्यात येईल. संचालन कार्यक्रम संयोजक ललित घाटबांधे यांनी केले. आभार मंगला डहाके यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुस्लिम लायब्रेरी भंडारा व मैत्री फुड पार्इंटचे संचालक मनोज रक्षिये व संचालिका मनिषा रक्षिये यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात कल्पना डांगरे, सुहासिनी अल्लडवार, दिपा काकडे, राखी सूर, सुधा बत्रा, मनिषा इंगळे, संगिता भुजाडे, अर्चना गुर्वे, अंजली वंजारी, कांता बांते, अंजु पिपरेवार, विजयालक्ष्मी वैद्य, संगिता सुखानी, शिल्पा न्यायखोर, चित्रा झुरमुरे, सुष्मा घुबडे, प्रणिता पाटील, श्रद्धा डोंगरे, किरण भावसार, मंगला क्षिरसागर, शालिनी सुर्यवंशी, वैशाली झाडे, श्वेता वाडीभस्मे, शरयू टाकळकर, अल्का खराबे, मधुरा मदनकर, मंदा पडोळे, संध्या रामटेके, वंदना दंडारे, ज्योती मलोडे, दिपा टेंभुर्णे, सविता डोरले, स्रेहा वरकडे, शशांक रामप्रसाद, विनोद भगत, सुधाकर गोन्नाडे, माधव तिघरे, दिगांबर बारापात्रे व सुरज यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)