शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शिक्षक बदली धोरणात सकारात्मक बदल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:20 IST

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून विद्यार्थी व शिक्षक हिताचा विचार करून शासन निर्णयात दुरूस्ती करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची ग्वाही : दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग लागू करावा, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून विद्यार्थी व शिक्षक हिताचा विचार करून शासन निर्णयात दुरूस्ती करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले असता त्यांनी हे आश्वासन दिले. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबोरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने गुरूवारला शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदनातून माहिती दिली. २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे ग्रामविकास विभागाने शिक्षकांचे नवीन बदली धोरण जाहीर केले आहे. या नवीन धोरणामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.बदल्यांबरोबरच १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेंशन लागू करावी, संगणक प्रशिक्षण मुदतवाढीचे पत्र त्वरीत काढावे, दिवाळीपुर्वी सातवा वेतन आयोग लागू करावा, जिल्हा परिषदेच्या शाळेला मोफत विज पुरवठा करावा, दर्जावाढ दिलेल्या विषय शिक्षकांना प्राथमिक पदविधर शिक्षकांची वेतनश्रेणी द्यावी, धान्यादी वस्तुंचा पुरवठा शासनाकडूनच करावा आदी महत्वाच्या विषयांवर चर्चा केली.यासर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी खासगी सचिव मंदार वैद्य व शेवाळे उपस्थित होते. यावेळी शिक्षकनेते संभाजीराव पवार, राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, उपनेते एन.वाय. पाटील, महेंद्र जानबुळे, सुधीर वाघमारे, सोमनाथ तेलुरे, आर. के. खैरणा, सुभाष अहिरे, विनायक टेंभरे, अर्जुन ताकाटे, मुबारक सैय्यद आदी पदाधिकारी सहभागी होते.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या सुचनेनुसार ग्राम विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेवून चर्चा केली आणि राज्यातील शिक्षकांना समाधानी, आनंदी ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्या गोष्टी करणार असल्याचे ग्रामविकास सचिव गुप्ता यांनी आश्वासन दिले.यावेळी जिल्हा सरचिटणीस सुधीर वाघमारे, शिक्षक नेते राजेश सुर्यवंशी, राजू सिंगनजुडे, नरेश शिवरकर, राधेश्याम आमकर, सुरेश हर्षे, विनायक मोथरकर, राजन सव्वालाखे, विकास गायधने, दिनेश खोब्रागडे, के.डी. भुरे, अरविंद रामटेके, विठ्ठल गभने, दिनेश घोडीचोर, तेजराम वाघाये, प्रभू तिघरे, विजय वाघाडे, देवानंद दुबे, दिनेश गायधने, हरीदास घावडे, अविनाश निखाडे, रमेश नागपुरे, उमाजी देशमुख, विठ्ठल हारगुडे, प्रकाश महालगावे आदी उपस्थित होते.या विषयांवर झाली चर्चासर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी दिला जाणारा खो राहणार नाही, संवर्ग एक व दोन यांच्या पसंतीक्रमाने बदल्या होणार, संवर्ग तीनच्या बदल्या संवर्ग एक व संवर्ग दोन यांच्या बदलीमुळे रिक्त होणाºया व पुर्वी रिक्त जागेवर होणार, संवर्ग एक व दोन मध्ये चुकून चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांना दुरूस्तीची संधी दिली जाणार, संवर्ग चारच्या बदल्या होणार नाही, आंतरजिल्हा बदलीच्या दुसºया टप्प्यातील बदल्या नोव्हेंबरमध्ये करणार, जिल्हांतर्गत बदली सप्टेंबर अखेर पूर्ण करणार, १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत संगणक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांची वसूली थांबविणार, शिक्षक संघाच्या शिष्ट मंडळाचे या चर्चेतून समाधान झाले नाही. त्यामुळे उर्वरित प्रश्नांसाठी पुन्हा चर्चा होणार असल्याची माहिती भंडारा जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांनी दिली.