शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

परिश्रमाशिवाय यश नाही

By admin | Updated: June 28, 2016 00:39 IST

घरी अठराविश्वे दारिद्र्य, विड्या बांधून शिक्षण घेतले. आज माझी महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

सुखदेवे यांचे प्रतिपादन : गुणवंतांचा सत्कार सोहळाभंडारा: घरी अठराविश्वे दारिद्र्य, विड्या बांधून शिक्षण घेतले. आज माझी महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यामुळे परिश्रमाशिवाय जीवनात यश नाही, असे प्रतिपादन डॉ. मोरेश्वर सुखदेवे यांनी केले. भंडारा जिल्ह्यातील डॉ. सुखदेवे यांची रिझर्व बँँक आॅफ इंडियाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. ही भंडारा जिल्हावासीयांसाठी व समाजासाठी भूषणासह बाब आहे. त्या प्रीत्यर्थ दी भंडारा बॅकवर्ड क्लास को आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने वैशालीनगर येथील बुद्धविहारात त्यांचा सत्कार करण्यात आला . त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. प्रकाश ढोळे, सामाजिक कार्यकर्ते वामनराव मेश्राम, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, डी. एफ. कोचे उपस्थित होते.याप्रसंगी सत्कारमूर्ती डॉ. मोरेश्वर सुखदेवे यांना स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेत प्राण्यिश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवीदिल्ली स्थित आलेपूर रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण भूमिच्या यशस्वी आंदोलनात सहभागी झालेल्या भंडारा येथील २० भीम सैनिकांचा सत्कार करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. अ‍ॅड. प्रकाश ढोळे यांनी काही संस्थांना 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या गं्रथाचे वाटप केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव मन्साराम दहीवले यांनी केले. संचालन अ‍ॅड. वैभव आंगले यांनी केले. आभार पी. के. ठवरे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)ग्रामपंचायतीचे संगणक धूळ खात लाखनी: ग्रामपंचायतीच्या कामकाजात गतीमानता यावी, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय पेपरलेस व्हावे, यासाठी प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना संगणक संच दिले. संगणक आॅपरेटरची नियुक्तीही करण्यात आली. परंतु बहुतांश ग्रामपंचायतीचे संगणक धूळ खात पडले आहे. त्यामुळे ई-ग्रामपंचायतीचा फज्जा उडाल्याचे लाखनी तालुक्यात दिसत आहे.