शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दररोज 10 ते 15 जणांच्या नशिबी शिवभोजन थाळी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र, ग्रामीण भागात दररोज ७५ थाळी एका केंद्राला एका दिवसात वाटप करण्याच्या सूचना आहेत. परंतु उपाशी राहणारे लोक थाळीभोजन करण्यासाठी आले तरी दररोज काही लोक भोजनाशिवाय खाली परत जात आहेत.

ठळक मुद्देपाच लाख नागरिकांनी घेतला लाभ : ३८ केंद्रांवरून जिल्ह्यात सेवा सुरू

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रचालकांना शासनाकडून प्रती थाळी अनुदान ठरवून देण्यात आले आहे. जिल्ह्यात ३८ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत ५ लाख नागरिकांना भोजन देण्यात आले. गरजूंचे पोट भरण्यासाठी शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु या शिवभोजन थाळीला मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने अनेक केंद्रांवरून दररोज १५ ते २० लोक उपाशी परत जात आहेत. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र, ग्रामीण भागात दररोज ७५ थाळी एका केंद्राला एका दिवसात वाटप करण्याच्या सूचना आहेत. परंतु उपाशी राहणारे लोक थाळीभोजन करण्यासाठी आले तरी दररोज काही लोक भोजनाशिवाय खाली परत जात आहेत.शासनाने सुरु केलेल्या शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक भाजी, भात, आमटी असे पोटभर जेवण दिले जाते. सर्वसामान्यांना जरी मोफत अथवा पाच ते दहा रुपये मोजावे लागत असले तरी शासन केंद्र चालकांना ग्रामीण भागात ३५ रुपये तर शहरी भागात ४५ रुपयांचे अनुदान देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उत्तम प्रतीचे जेवण मिळत असल्याने ही योजना सामान्यांना दिलासा देणारी ठरली आहे. ग्रामीण भागातुन विविध कामांसाठी लवकर आलेल्या नागरिकांना शिवभोजन थाळीमुळे कमी पैशात चांगले जेवण मिळत आहे. जिल्ह्यात सुरुवातीला १३ शिवभोजन केंद्र होती. मात्र आता नागरिकांचा वाढत असलेला प्रतिसाद पाहुन राज्य शासनाने या केंद्रांची संख्या वाढविल्याने आता जिल्ह्यात एकुण ३८ केंद्रांमार्फत शिवभोजन थाळी दिली जात आहे. जिल्हास्तरावरुन अनुदान प्राप्त होताच केंद्र चालकांना अनुदान वितरीत करण्यासाठी पाठपुरावा होतो.

दररोजच्या थाळीसाठी अधिक लोकत्रिमुर्ती चौक भंडारा : शहरातील त्रिमुर्ती चौकात शिवभोजन थाळीकरिता १५ ते २० लोक अधिक येतात. परंतु थाळींची संख्या एवढे वाटप झाल्यानंतर पुन्हा वाढविण्यासाठी जेवण तयार नसते.

जिल्हा परिषद भंडारा : शासनाने दिलेल्या संख्येनुसारच जेवण तयार होत असल्याने अधिकच्या लोकांना जेवण देता येत नाही. एक-दोघे असल्यावर त्यांना जेवण समाज भावनेतून दिले जाते. परंतु जास्त लोक आले तर त्यांना जेवण देण्यासाठी तयार नसते.

रोज २००० लोकांचे पोट भरते; बाकीच्यांचे काय? 

- जिल्ह्यात ३८ शिवभोजन थाळी केंद्रे आहेत. यातून जिल्ह्यातील २०७० नागरिकांना दररोज जेवणाची सोय होते.- शिवभोजन थाळीची मागणी करणारे हात अधिक आहेत. मात्र, केंद्र संचालकांना ७५ थाळींचीच परवानगी दिली आहे. 

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय