शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 974 शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन शिक्षण कसे आहे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांस शिक्षण दिले जात आहे; पण खेड्यापाड्यातील अनेक मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. ज्यांच्याकडे आहे त्यांना इंटरनेटचा खोडा आहे. हे जरी असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे शिक्षण विभाग सांगतो.  वास्तव वेगळेच आहे. जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ३४९ शाळेत इंटरनेट सुविधा आहे, तसेच ९७४ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडे स्मार्टफाेनचा अभाव : यू-डायस प्लसने वास्तव केले उघड

राजू बांतेलाेकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : कोविड-१९ च्या प्रभावामुळे  मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे असा आभासी दावा शालेय शिक्षण विभाग करीत आहे; पण जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ९७४ शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याची बाब यू-डायस प्लसला दिसून आली आहे.  मग विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कसे सुरू आहे, असा प्रश्न समोर येत आहे.‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांस शिक्षण दिले जात आहे; पण खेड्यापाड्यातील अनेक मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. ज्यांच्याकडे आहे त्यांना इंटरनेटचा खोडा आहे. हे जरी असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे शिक्षण विभाग सांगतो.  वास्तव वेगळेच आहे. जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ३४९ शाळेत इंटरनेट सुविधा आहे, तसेच ९७४ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे बऱ्याच शिक्षकांकडून व्हाॅट्सॲप,  झूम मीट व शिक्षण विभागाच्या दीक्षा ॲपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविले जात आहे.  

शिक्षकांच्या माेबाईलचा आधार- शाळेत इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे शिक्षकांना स्वतःच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागते. खरं तर काही बोटावर मोजण्याइतक्या शाळा सोडल्या तर ऑनलाइन शिक्षण होत नाही, ही वास्तविकता आहे. दीक्षा ॲपमधील पीडीएफ व शाळा बंद शिक्षण सुरू ही माहिती इकडची तिकडे पाठविली जाते. यातून किती विद्यार्थी मोबाइल शिक्षण घेतात, हा प्रश्न आहे. यावर मात्र कुणाकडेही उत्तर नाही.

 शिक्षकांना माेबाईलचा आधार

मोबाइलने आकृत्या, प्रतिकृती शिकविणे अवघड आहे.   काठिण्यपूर्ण भाग शिकवूनही विद्यार्थ्यांना समजत नाही. अनेक शाळांत संगणक, प्रोजेक्टर असूनही धूळ खात आहेत. शासनाने इंटरनेटला सुविधा पुरविली पाहिजे.- सुनीता तोडकर, मुख्याध्यापिका  स्व. पुष्पलताताई तोडकर विद्यालय, नरसिंगटोला

ऑनलाइन शिक्षण   प्रभावी नाही.  फेस टू फेस शिक्षण होत नाही.   प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे अनुभवता येत नाही. त्यासाठी शाळेत विद्यार्थी आले पाहिजेत. अभासी अभ्यास विद्यार्थ्यांच्या फारसे लक्षात राहत नाही.- राजेश निनावे, सहायक शिक्षक, महात्मा ज्योतिबा फुले, धुसाळा 

ऑनलाईन शिक्षण  काय असते रे भऊ

ऑनलाइन मला माहीत नाही. गरीब असल्याने ना फोन ना टीव्ही. एक वर्षापासून शाळा बघितली नाही. आई-बाबा मजुरीला जातात. लहान बहिणीला सांभाळावे लागते. शाळा सुरू झाली पाहिजे. शाळा सुरू झाली नाही तर माझेच काय माझ्या सारख्या अनेकांचे शिक्षण थांबल्याशिवाय राहणार नाही.- अनुज मारबदे, विद्यार्थी, मोहगाव देवी

घरी मोबाईलच मग ऑनलाईन शिक्षण कस होते हे थोडेच माहीत होणार. कुणाकडून किंवा शिक्षक घरी येतात. तूम्हाला हे करायच आहे. तेंव्हा अभ्यासाबाबत माहिती होते. शाळा सुरू झाली तरच आमचे अध्ययन प्रभावी होईल.”- सेजल सार्वे, विद्यार्थीनी, कान्हळगाव

 

टॅग्स :SchoolशाळाInternetइंटरनेट