शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

तिथे घराघरांतून निनादतो स्वातंत्र्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 22:28 IST

१५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीण सण. झेंडावंदन, सलामी, प्रभातफेरी, घोषणा व भाषणे हा सर्वत्र दिसणारा .....

ठळक मुद्देढोलसरवासीयांची परंपरा : प्रभातफेरीचे घरोघरी केले जाते पूजन

हरिश्चंद्र कोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बुज) : १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीण सण. झेंडावंदन, सलामी, प्रभातफेरी, घोषणा व भाषणे हा सर्वत्र दिसणारा राष्ट्रीय सणाचा सर्वसाधारण परिपाठ. परंतु लाखांदूर तालुक्यातील ढोलसर या लहानशा खेडेगावाने मागील ५८ वर्षांपासून राष्ट्रीय सणाचा वेगळाच परिपाठ जपला आहे. येथे स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी प्रभातफेरीची पुजा होते व घरांघरातून निनादतो राष्ट्रपे्रमाचा जल्लोष.राष्ट्रीय सणाला गावातील प्रत्येक घरातील गृहिणी आपल्या दारासमोर सडासंमार्जन करून छान रांगोळी घालते. गावातील सर्व मार्गावरून प्रभातफेरी काढली जाते. यात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, गावातील पुढारी, तरूण वर्ग व गावकरी सहभागी होतात.एका खुर्चीवर महात्मा गांधींचा फोटो ठेऊन ती खुर्ची डोक्यावरून प्रभातफेरीसोबत फिरविली जाते. प्रत्येक दारापुढे ही प्रभातफेरी थांबते. त्या घरातील गृहिणी पंचारतीने बापूंच्या प्रतिमेला ओवाळून पूजा करते. प्रभातफेरीतील ज्येष्ठांना देखील पंचारतीने ओवाळले जाते. त्यानंतर प्रत्येक घरातून प्रसाद घेतला जातो. विद्यार्थ्यांकडून ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या जातात. त्यानंतर ही प्रभातफेरी पुढच्या दाराजवळ थांबते. पुन्हा तशीच ओवाळणी आणि तशाच घोषणा देत ही प्रभातफेरी गावभर फिरते. घरोघरी फिरून स्वातंत्र्याचा जयघोष करते. येथील वयोवृद्ध नागरिक देवराव बगमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे सन १९५९ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू झाली. त्यावेळी तत्कालीन सरपंच गोविंदा बगमारे आणि पोलीस पाटील सीताराम वाढई यांनी राष्ट्रीय सणाला गावकºयांनी आपापल्या दारापुढे प्रभातफेरीची पूजा करावी असा निर्णय घेतला आणि गावात दवंडी देवून गावकºयांना अशा पद्धतीने राष्ट्रीय सण साजरा करण्याचे आवाहन केले तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अविरत सुरू आहे.यावर्षीही त्याच परंपरेनुसार येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल, असे सरपंच जगन हुकरे यांनी सांगितले. ही पंरपरा येथे अखंडपणे सुरू असताना ढोलसरवासीयांना आपण काहीतरी वेगळे करत असल्याचा मागमुसही नाही. राष्ट्रीय सणाला धार्मिक उत्सव आणि उत्साहाची जोड देऊन या गावाने अमिट ठसा उमटविला आहे. राष्ट्रभक्ती जोपासण्याचा संदेश पुढारी देतात. मात्र या गावकºयांकडून प्रत्यक्ष कृतीतून दिला जाणारा हा संदेश प्रशंसनीय असाच म्हणावा लागेल.