शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

पासधारकांच्या माध्यमातून सव्वा दोन कोटी तिजोरीत

By admin | Updated: October 15, 2014 23:15 IST

‘लोकवाहिनी’ अशी बिरूदावली मिरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभार्थी लाभ घेत आहेत. भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सहा आगारातून सप्टेंबर महिन्यात

प्रशांत देसाई - भंडारा‘लोकवाहिनी’ अशी बिरूदावली मिरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभार्थी लाभ घेत आहेत. भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सहा आगारातून सप्टेंबर महिन्यात ३ लाख ४३,३५० पासधारक प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला आहे. त्यांना पासवर मिळालेल्या सवलतीवर एसटी महामंडळाला २ कोटी २५ लाख ७०,३४० रूपयांचा लाभ शासनाकडून मिळणार असल्याने एसटीच्या तिजोरीत वाढ होणार आहे. रापमंच्या भंडारा विभागीय कार्यालयांतर्गत भंडारा, पवनी, तुमसर, साकोली, गोंदिया व तिरोडा असे सहा आगार आहेत. या आगारातुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रवाशांना देण्यात येतात. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना प्रवासी पासच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहे. एसटीच्या मुख्य सवलतीत लाभ घेणाऱ्यांमध्ये विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात विभागांतर्गत लाभ घेणाऱ्यांमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा समावेश वगळता अन्य प्रकारच्या योजनांचा लाभ अनेकांनी घेताला आहे.शासनाने शालेय विद्यार्थीनींना इयत्ता ५ ते १० पर्यंतच्या शिक्षणासाठी अहल्याबाई होळकर यांच्या नावाने घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी मोफत पास योजना सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थींनींना १०० टक्के सवलत देण्यात येते. यात ४ हजार ३८४ विद्यार्थींनींना लाभ मिळाला आहे. त्यांच्या मोफत पाससाठी शासनाकडून भंडारा विभागाला एका महिन्यासाठी २७ लाख ३४,६५९ रूपये प्राप्त होणार आहे. विद्यार्थी मासिक पास योजनेत विद्यार्थ्यांना तिकिट दराच्या ३३ टक्के रक्कम द्यावे लागते. उर्वरीत रक्कम शासन देते. यात २१,६०१ विद्यार्थी लाभार्थी आहेत. बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग सुटीत स्वगावी येण्यासाठी ५० टक्के सवलतीवर पास देण्यात येते. यात १०२ विद्यार्थी लाभार्थी आहेत. परिक्षार्थींना ५० टक्के सवलत देण्यात येते. यात २२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. शैक्षणिक शिबिरांसाठी, आजारी आईवडिलांना भेटण्यासाठी, शैक्षणिक सहल, शैक्षणिक स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक, क्षयरुग्ण, कर्करुग्ण असलेल्या प्रवाशांना तिकिटाच्या ५० टक्के सवलत देण्यात येते. यात मागील महिन्यात शिबिरासाठी १७९ विद्यार्थी, आईवडिलांची भेट घेणाऱ्यांमध्ये २६ विद्यार्थी, सहलीसाठी २७७ विद्यार्थी, ८ क्षयरुग्ण, १०८ कर्करुग्ण लाभार्थ्यांचा समावेश आहे. २ लाख ४४,४३६ ज्येष्ठ नागरिकांना एसटीने प्रवास सवलत दिली आहे. कुष्ठरुग्णांना ७५ टक्के सवलत देण्यात येते. अंधव्यक्तींना ७५ टक्के तर त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याला प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळतो. १,१७३ अंध व्यक्तींना तर १२९ सहकाऱ्याला प्रवासात लाभ देण्यात आला आहे. अपंगांना ७५ टक्के प्रवास सवलत देण्यात येते. असा लाभ ६७,०८६ अपंगांना देण्यात आला आहे. २,२४५ सहकाऱ्यांना ५० टक्के प्रवास लाभ देण्यात आला. २२ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना १०० टक्के प्रवास लाभ देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कारप्राप्त पासधारकाला १०० टक्के सवलतीचा लाभ प्राप्त झाला आहे. तीन आदीवासी सेवक पुरस्कार प्राप्त लाभार्थी, एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त व्यक्तीला प्रवास लाभ देण्यात आला आहे.२० दिवसाचे पैसे भरून ३० दिवसाचा प्रवासाचे ७४५ लाभार्थी असून ४५ दिवसाचे पैसे भरून ९० दिवसांचा प्रवास करणारे ४२२ प्रवासी आहेत. कुठून कुठेही प्रवासासाठी १० टक्के सवलतीवर २०० रूपयांचा वार्षिक प्रवास पास देण्यात येतो. यात प्रवाशाला एक लाखाचा विमा देण्यात यतो. या प्रकारात ३८० प्रवाशांना लाभ देण्यात आला आहे. आवडेल तिथे प्रवास योजनेचा १९३ प्रवाशांनी लाभ घेतला.