शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

तुमसर विधानसभा मतदारसंघातील १६ गावे आहेत मध्यप्रदेशाच्या सीमेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:27 IST

Bhandara : सीमेलगतच्या ६ गावांशेजारी राहणार चेक पोस्ट

मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघ हा राज्याच्या शेवटच्या टोक असून या तुमसर मतदार संघाच्या सीमेलगत मध्य प्रदेशाची सीमा आहे. मध्य प्रदेशाच्या सीमेवरील १६ गावांचा समावेश आहे. येथे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी सहा चेक पोस्ट लावले आहेत.

तुमसर तालुक्यातील मध्य प्रदेशाच्या सीमेलगत चिखली, देवनारा, बाजारटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, सोंड्या, वारपिंडकेपार, महालगाव, देवसर्रा, बपेरा (सि.) आदी १६ गावे आहेत.

तुमसर मोहाडी विधानसभेत २८ सप्टेंबरच्या नोंदीनुसार एकूण मतदारांची संख्या ३,०९,०८१ इतकी असून त्यात पुरुष मतदारांची संख्या १,५५,१५० तर महिला मतदारांची संख्या १,३३,९३० इतकी आहे. या मतदारसंघात दोन तालुके असून यापैकी तुमसर तालुक्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या ३५३ आहे. तुमसर तालुक्यात मतदान केंद्राची संख्या २०८ तर मोहाडी तालुक्यात १४५ मतदान केंद्र आहेत. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आंतरराज्यीय सिमा चेक पोस्ट बैठकनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरी (बु) मॉईल येथे आंतरराज्य सिमा चेक पोस्ट बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा समन्वय साधून कामकाजाबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीला पोलिस विभागाअंतर्गत नागपूर क्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, बालाघाटचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय कुमार, जिल्हाधिकारी संजय कोलते, गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, भंडाराचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन, गोंदियाचे गोरख भामरे, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, पोलिस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंदिया व ईतर वरीष्ठ अधिकारी बैठकीला हजर होते. या अधिकाऱ्यांनी बावनथडी, बपेरा चेकपोस्ट येथे भेट देवून दोन्ही राज्याच्या सिमा सुरक्षीततेबाबत आढावा घेतला.

सहा गावाजवळ चेक पोस्टनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा पोलिस प्रशासनाने सहा चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. त्यात हिवरा, पाहुनी, बपेरा (सी.) पाथरी, देवनारा, देव्हाडा बु. या गावांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पोलिसांचा आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.

मतदानाची अशी होती टक्केवारी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये तुमसर विधानसभा मतदारसंघात एकूण मतांची टक्केवारी ७०.२६, विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये मतदानाची टक्केवारी ७०.५१ तर लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी ६७.५३ टक्के होती.

टॅग्स :bhandara-acभंडारा