शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तिसरी लाट ओसरली; आतापर्यंत 7745 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

कोरोनाच्या तिन्ही लाटेत मिळून आजपर्यंत ६७ हजार ८५६ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्यापैकी ६६ हजार ६६७ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. सध्या दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर ०.६३ इतका असून एकूण पाॅझिटिव्हिटी दर ११.९० इतका आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२५ इतके आहे. बुधवारी १२७४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत ७ हजार ७४५ व्यक्ती बाधित झाल्या असून आठ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४७ रुग्ण सक्रिय असून बाधित झालेल्यांपैकी ७ हजार ६९० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटेत मिळून आजपर्यंत ६७ हजार ८५६ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्यापैकी ६६ हजार ६६७ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. सध्या दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर ०.६३ इतका असून एकूण पाॅझिटिव्हिटी दर ११.९० इतका आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२५ इतके आहे. बुधवारी १२७४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. यात भंडारा, मोहाडी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर लाखनी तालुक्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत तालुकानिहाय आकडेवारीत भंडारा १३, मोहाडी ३, तुमसर व पवनी प्रत्येकी २, लाखनी १५, साकोली ९, तर लाखांदूर तालुक्यातील तीन बाधितांचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ११३४ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिसऱ्या लाटेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीत मृत्यू दर ०१.६८ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५ लाख ७० हजार ४०३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यात ५२१, मोहाडी १००, तुमसर १२९, पवनी ११३, लाखनी ९९, साकोली १०९, तर लाखांदूर तालुक्यातील ७१ जणांचा समावेश आहे. तिसऱ्या लाटेत भंडारा व मोहाडी तालुक्यातील २, पवनी तालुक्यातील १, तर साकोली तालुक्यातील तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेतील मृत्यू दर ०.१० टक्के इतका आहे.

१४ हजार ४८१ व्यक्तींनी घेतला प्रिकाॅशन डोस- जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती सुयोग्य स्थितीत आहे. आतापर्यंत जिल्हाभरात दोन्ही डोस मिळून १७ लाख ९० हजार ५७३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ५४ हजार ४४९ इतकी असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख २१ हजार ६४३ इतकी आहे. याशिवाय तिसऱ्या लाटेदरम्यान शासनाने सुरू केलेला प्रिकाॅशन डोस घेणाऱ्या व्यक्तींची संख्या १४ हजार ४८१ इतकी झाली आहे. प्रभावी जनजागृतीमुळे जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी उत्तम आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या