शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यास चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:53 IST

सीईओंची आकस्मिक भेट : बेटाळा शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी: नॅशनल अचिवमेंट सर्वे (NAS) यातून सर्वसमावेशक शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. या अंतर्गत बेटाळा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी आकस्मित भेट दिली. त्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली असल्याचे चित्र दिसून आले.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी ३० नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. जिल्हा परिषद निधीमधून सर्व शाळांना चाचणींचे पेपर पूर्ण झाले होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक क्षमता स्तर पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के यांनी मोहाडी तालुक्यातील काही शाळांना आकस्मित भेटी दिल्या. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा बेटाळा येथील शाळेला भेट देताना परिपाठ सुरू होता. परिपाठ अतिशय चांगला होता. त्याचे कौतुकही कुर्तकोटी यांनी केले. 

त्यानंतर राष्ट्रीय संपादणूक चाचणी झालेल्या पेपरच्या ओएमआर शीटचे परीक्षण केले. परीक्षणानंतर वर्गात विद्यार्थ्यांशी चाचणी झालेल्या प्रश्नपत्रिकांवर केली चर्चा केली. विद्यार्थ्यांकडून चाचणी संदर्भात माहिती काढून घेतली. चाचणी व विद्यार्थ्यांसोबत झालेल्या संवादात त्यांना बराच फरक दिसून आला. तथापि शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे कुर्तकोटी यांना दिसून आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी मनीषा गजभिये, गटविकास अधिकारी दिनेश हरीणखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी शरद कुकडकर उपस्थित होते. 

शिक्षकांना खडसावले या प्रकारानंतर समीर कुर्तकोटी यांनी शाळेतील येथील मुख्याध्यापक व शिक्षकांची संयुक्त्त सभा घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल असमाधान व्यक्त करून शिक्षकांची कानउघडणी केली. यापुढे चांगले काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. दैनंदिन विस्तारपूर्वक टाचण काढा, शैक्षणिक साहित्यांच्या वापर करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुन्हा चाचणी परीक्षा घ्यायेथील शिक्षकांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीच्या धर्तीवर पंधरा दिवसांनी सराव चाचणी परीक्षा आयोजित करावी. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासावी. त्यानंतरही विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली नाही, तर शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य कार्यपालन अधिकारी कुर्तकोटी यांनी दिला.

टॅग्स :bhandara-acभंडाराEducationशिक्षण