शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषी पंप योजनेतून संपणार भारनियमनाची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 12:35 IST

शेतकऱ्यांनो, अर्ज केला का? : 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना'

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' सुरू करण्यात आली आहे. यामुळे भारनियमनाची समस्या संपून, संपूर्ण आठ तास नियमित पाणी मिळण्यास मदत होईल. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतील. लाभार्थी निवडीचे निकष महावितरणने निश्चित केले आहेत. पाच एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यांस ३ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरवरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषिपंपाची मागणी केल्यास ती ग्राह्य धरली जाईल. 

वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहीर व नदी, आदी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी हे पंप वापरता येणार नाही. 

अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ ज्यांना मिळाला नाही, ते शेतकरीदेखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील. 

काय आहे 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना'? ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंच- नाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. राज्यात सौर कृषी पंप कार्यान्वित होणार आहेत.

पाच वर्षांची दुरुस्ती हमीमागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे. सर्वसाधारण गटाच्याशेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच दिला जाईल. अनुसूचित जाती-जमातींच्या शेत- कऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के भरावा लागेल. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार- कडून अनुदान म्हणून दिली जाईल. जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचा पंप योजनेंतर्गत दिला जाईल. सौर पंपाची पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्ससह संच दिला जाणार आहे. सौर ऊर्जेवर पंप चालणार असल्याने वीज बिल येत नाही, त्यामुळे भारनियमनाची चिंता शेतकऱ्यांना नाही. 

येथे करावा लागेल अर्ज 

  • मागेल त्याला कृषी पंप योजनेसाठी शेतकरी महावित- रणच्या mahadiscom.in/solar या वेब पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. 
  • सध्याच्या कृषी पंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी, आदी तपशील देणे अनिवार्य आहे. सातबारा उतारा प्रत, आधार कार्ड, एससी, एसटी लाभार्थीसाठी जात प्रमाणपत्र यासह इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा