शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रति ब्रास ६०० रुपये भावाची रेती झाली ११०० ते १५०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:04 IST

Bhandara : बांधकाम व्यवसाय झाला ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : रेती चोरीला आळा बसावा याकरिता राज्य शासनाने शासकीय रेती डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी प्रति ब्रास ६०० रुपये इतका भाव होता, तर यावर्षी ११०० ते १५०० इतका ठरविण्यात आला आहे. सर्वसामान्यांना रेती आता प्रति ट्रॅक्टर ३५०० रुपयाने खरेदी करावी लागत आहे. सध्या शहर व ग्रामीण भागातील बांधकाम ठप्प पडले आहेत. शासकीय रेती डेपो सुरू करून सर्वसामान्यांना येथे तोटा झाल्याचे दिसून येते.

तुमसर तालुक्यात सध्या महसूल प्रशासनाने शासकीय रेती डेपो सोंड्या, मांडवी, लोभी, आष्टी, चारगाव येथे सुरू केले आहे. तुमसर तालुक्यातील रेती ही उच्च गुणवत्तेची असल्याने तिला मोठी मागणी महानगरात आहे. नदीपात्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा महसूल प्रशासनाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार पाच घाटांवर शासकीय रेती डेपो सुरू केला आहे. मागील वर्षी प्रति ब्रास रेतीचा भाव ६०० रुपये इतका होता. यावर्षी शासकीय रेती डेपोवर भाव हा ११००, १२०० व १५०० इतका आकारण्यात आला आहे. 

ऑनलाइन नोंदणी करावीशासकीय रेती डेपोतून ऑनलाईन नोंदणी करावी लागते. सर्वसामान्य नागरिकही येथे ऑनलाइन नोंदणी करू शकतात; परंतु अनेकांना नोंदणी करण्याची प्रक्रिया माहिती नाही. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना याबाबत अजूनही जनजागृती झाली नसल्याने ट्रॅक्टर चालकांकडूनच रेती खरेदी केली जात आहे. रेती डेपोवर यावर्षी प्रतिब्रास रेतीची किंमत दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे रेती व्यवसाय करणाऱ्यांचाही नाईलाज आहे. महसूल प्रशासनाने येथे दखल घेऊन स्थानिकांना रेती कमी दरात उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

तालुक्यात ट्रॅक्टरची संख्या अडीच ते तीन हजारतुमसर तालुक्यात अडीच ते तीन हजार ट्रॅक्टरची संख्या असून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी येथे करण्यात आले. त्यामुळे त्याची किस्त पटवावी लागते. त्यामुळे हा व्यवसाय येथे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराsandवाळू