शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

'त्या' सांगाड्याचे रहस्य उलगडले, मुलानेच खून करून आईचे प्रेत फेकले होते जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 14:09 IST

मुलाविरुद्ध गुन्हा दाखल : अवघ्या १२ तासात पोलिसांनी लावला छडा

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : लाखांदूर ते साकोली राष्ट्रीय महामार्गावरील दांडेगाव जंगलात आढळलेल्या महिलेच्या सांगाड्याचे रहस्य आता उलगडले आहे. आईसोबत वारंवार भांडण करणाऱ्या मुलानेच आईचा खून करून नंतर मृतदेह पोत्यामध्ये बांधून जंगलात फेकला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे. चित्रलेखा ऊर्फ रेखा अरुण वासनिक (४५) असे या मृत महिलेचे नाव असून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित अरुण वासनिक (२५) असे आहे. दिघोरी (मोठी) या गावातील ते रहिवासी आहेत.

जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांना गुरुवारी अज्ञात महिलेचा सांगाडा आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे द्रुतगतीने फिरविली. परिसरातील मिसिंग असणाऱ्या महिलांची माहिती मिळवून शोध घेतला असता संशयाची सुई दिघोरी या गावाकडे वळली. यात, गावातील चित्रलेखा ऊर्फ रेखा अरुण वासनिक ही महिला बेपत्ता असल्याचे तपासात पुढे आले. यावरून अधिक चौकशी करून संशयित म्हणून सुमितला ताब्यात घेतले. तो नेहमीच आपल्या आईसोबत भांडण करायचा. याच काळात ६ मे च्या दरम्यान त्याने आईला जीवानिशी मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून दांडेगाव जंगल परिसरात नेऊन फेकल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनेत सीमा ज्ञानेश्वर मेश्राम (४०) रा. दिघोरी मोठी यांच्या तक्रारीवरून व ठाणेदार यांच्या आदेशावरून दिघोरी मोठी पोलिसांत संशयित आरोपी सुमित विरोधात भादंविचे कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत. 

स्वतःच दाखल केली होती आई हरविल्याची तक्रार आईचा खून केल्यानंतर सुमितने स्वतः दिघोरी पोलिस ठाण्यात जाऊन आई हरविल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तो साळसुदपणे गावात फिरत होता. तो मजुरीच्या कामावर जायचा तसेच त्याला मद्यपानाची सवय होती, अशी माहिती आहे.

आईसोबत व्हायचे रोज भांडण सुमित आपल्या आईसोबत रोज भांडण करायचा. अनेकदा हे भांडण कडाक्याचे होत असे. याची माहिती शेजाऱ्यांनाही होती. मात्र तो असे काही टोकाचे पाऊल उचलेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. गावातच या महिलेची लहान बहीण सीमा ज्ञानेश्वर मेश्राम (४०) राहते. तिलाही त्याच्या स्वभावाबद्दल माहिती होती. मे महिन्यात बहीण बेपत्ता झाल्यावर दिघोरी (मोठी) पोलिसात हरविल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. सीमा मेश्राम यांच्या तक्रारीवरूनच या घटनेत सुमितविरुद्ध खुनाचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा