शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली ! मागणी पूर्ण न झाल्यास ७ जुलैला आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:35 IST

Bhandara : प्रकरण शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठ्याचे

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी/पालोरा : जांभोरा, करडी, पालोरा, कोका परिसरातील शेतकऱ्यांना १६ ते १२ तास कृषी वीजपुरवठा मिळावा याकरिता करडी वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तीन दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर ७ जुलै रोजी वीज वितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे. 

आज उपोषण स्थळी शरदचंद्र पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी भेट देऊन आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे. करडी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य महादेव पचघरे यांनी वीज वितरण विभागाचे उपविभागीय अधिकारी गजानन जयस्वाल यांना बोलवून १२ तास कृषी वीजपुरवठा देण्याची मागणी केली असता गजानन जयस्वाल यांनी उपोषण स्थळी भेट दिली.

जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघरे यांनी आमदार राजू कारेमोरे यांचे प्रतिनिधी म्हणून उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची मागणी केली. लवकरच प्रश्न मार्गी लागणार आहे, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. पांडुरंग मुंगमोडे यांची प्रकृती खालावली असल्याने डॉ. सोनवने यांनी उपचार करून सलाईन लावली. आंदोलनात सहभागींची संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात आले.

आता पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनात एखादा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या बाबतीत अधिवेशनात प्रश्न मांडतील काय? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी याच ठिकाणी शेतकऱ्यांकडून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते. दरम्यान लेखी लिहून दिले होते की, १२ तास वीज देण्यात येईल. मोहाडी वीज वितरण विभाग अभियंता सुनील मोहुर्ले यांना विचारले असता, वरिष्ठांच्या बोलण्यावरून तेव्हा आश्वासन दिले, त्यामुळे माझी चूक झाली, अशी कबुली मोहुर्ले यांनी दिली.

"करडी येथील आमरण उपोषणाला खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी उपोषणकर्त्यांना भेटून समस्या जाणून घेतली. वीज वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १२ तास वीज देण्यासंबंधी चर्चा केली असता वरिष्ठांकडून प्रश्न मार्गी लागला नाही. शासनाने तत्काळ उपोषणकर्त्यांची मागणी मंजूर करावी. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नये. वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरू."- डॉ. प्रशांत पडोळे, खासदार.

टॅग्स :bhandara-acभंडाराelectricityवीजFarmerशेतकरी