शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चुलबंध नदीच्या घाटांवरून वाळू तस्करांचा धुमाकूळ, शासकीय नियमांची एैसीतैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 15:40 IST

कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या महसूल विभाग व पोलिसांवर वाळू तस्करांकडून होणारी पैशाची उधळण यावरून यांच्यातील आर्थिक हितसंबंध उतू चालल्याचे दिसून येत आहे.

- देवानंद नंदेश्वर

भंडारा : साकोली तालुक्यातील सासरा, विहीरगाव बुराड्या, भूगाव, मिरेगाव, कटंगधरा परिसरात चुलबंद नदी घाटांवर अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या महसूल विभाग व पोलिसांवर वाळू तस्करांकडून होणारी पैशाची उधळण यावरून यांच्यातील आर्थिक हितसंबंध उतू चालल्याचे दिसून येत आहे.

वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने सासरा, विहीरगाव, सानगडी व इतर गावातील युवक मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व शासकीय नियम पायदळी तुडवून दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू आहे.वाळू तस्करांनी याची स्वतःची यंत्रनाही तयार केली आहेसानगडी परिसरात अनेक गावात विकास कामे जोमात सुरू आहे. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी चुलबंद नदी पात्रातून अमर्यादपणे रेतीचा उपसा सुरू आहे. पूर्वी गावातील छोट्या-मोठ्या बांधकामापर्यंत मर्यादित असणारी रेतीची मागणी प्रचंड वाढली. 

रेती माफियाकडून रात्रीच्या वेळी नदीपात्रात वाहणे उभे करून त्यात रेती भरून गुपचूपपणे गावाच्या बाहेर काढून दिली जातात. या रेती उपसावर कारवाईसाठी महसूल विभागातील तहसीलदाराचे पथक कार्यरत आहे. परंतु महसूल विभागाचे कर्मचारी आर्थिक लालसेपोटी पैशाची देवाण-घेवाण करून कारवाई न करता उलट सोडून देत आहे. कारवाईसाठी येत असलेले महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस हेच रेती तस्करावर अधिकच मेहरबान असल्याने रेती तस्करीसारखे प्रकार सातत्याने घडत आहे.

महसूल विभागाच्या पथकांवर राजकीय दडपणनदीपात्रातून चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा करायचा, काही काळ ही वाळू साठवायची, नंतर जास्त दराने रेतीची विक्री करून अमाप पैसे मिळवायचे असा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे या मार्गात अडथळा ठरणाऱ्या महसूल विभागाच्या पथकांवर राजकीय दडपण आणण्याचे प्रकार होत आहे. नदीपात्रातून रात्रीच्या वेळी वाळू उपसा केला जातो. वाळूचा अवैध उपसा केलेल्या रेतीसाठा सासरा, विहीरगाव, भूगाव, कटंगधरा, मिरेगाव घाटावरून सानगडी मार्गे इतरत्र रात्री बे रात्री, पहाटे पोहोचविले जातो.अनेक महिन्यापासून सुरू आहे. रेती तस्करीने नागरिकांची झोपमोड होत आहे.

कारवाईपुर्वीच रेती तस्कर अलर्टया रेती तस्करामागे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला महिन्याकाठी येथील काही रेती तस्कराकडून लाखो रुपये जमा करून पोहोचते करण्यात येत असल्याची चर्चा आहे. तो कर्मचारी कोण? असा प्रश्न आहे. रेती तस्कराची पोलीस व महसूल विभागाला माहिती दिली जाते. मात्र आर्थिक हित संबंधाने उलट या रेती तस्करांना तक्रारीची माहिती दिली जाते. साकोली महसूल विभागाचे पथक निघाले की आधीच या तस्करांना माहिती देत असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :sandवाळू