शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन शेतकऱ्याने संपवले जीवन; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: August 22, 2023 17:38 IST

आकस्मिक मृत्यूची नोंद

भंडारा : मागील काही वर्षांपासून मद्याच्या आहारी गेलल्या एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतशिवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव (को) शेत शिवारात उघडकीस आली. भिवा देवाजी मडावी (५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिस सूत्रानुसार, भिवा यांची पिंपळगाव (को) शिवारात शेतजमीन आहे. शेतीमध्ये शेतकऱ्याने यंदाच्या खरीप हंगामा अंतर्गत धान पिकाची लागवड केली होती. पिकांची पाहणी करण्यासाठी शेतकरी नियमित शेतात जात असे. सोमवारी त्याने आपण शेतात पाणी देण्यासाठी जात असल्याचे कुटुंबियांना सांगितले. शेतकरी शेतावर गेल्यानंतर त्याचा पुतण्या मुन्ना मडावी शेतात गेला असता भिवा स्वतःच्या शेतशिवारातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आला.

मुन्नाने ही माहिती कुटुंबीयांसह लाखांदूर पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार विलास मातेरे, पोलीस अंमलदार टेकचंद बुरडे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूbhandara-acभंडारा