शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जिल्ह्याला 41 लाख 88 हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 23:26 IST

आधारभूत किंमत धान खरेदी याेजनेंतर्गत खरीप हंगाम २०२२-२३ साठी जिल्ह्याला ४१ लाख ८८ हजार ४६७ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट केंद्रनिहाय तयार करुन पाेर्टलवर लाॅक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या स्थितीत भंडारा जिल्ह्यात ४६ केंद्रांना धान खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. दहा लाख ६४१ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी याेजनेंतर्गत खरीप हंगामातील धान खरेदीचे भंडारा जिल्ह्याला ४१ लाख ८८ हजार ४६७ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ४६ केंद्रांना सध्यस्थितीत १० लाख ६४१ क्विंटल धान खरेदीची परवानगी देण्यात आली असून, प्रत्यक्षात मात्र धान खरेदी सुरु झाली नाही. मात्र शनिवारपासून काही केंद्रावर धान खरेदी सुरू होणार असल्याची माहिती आहे. तर नवीन १३७ केंद्रांचा प्रस्ताव करण्यात आला आहे.दिवाळी संपली तरी जिल्ह्यात धान खरेदी सुरु झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी धान खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र स्टेट काे-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने २ नाेव्हेंबर राेजी एका आदेशाने जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. शनिवारपासून ४५ केंद्रांवर धान खरेदी सुरु हाेईल, असे सांगण्यात आले आहे.आधारभूत किंमत धान खरेदी याेजनेंतर्गत खरीप हंगाम २०२२-२३ साठी जिल्ह्याला ४१ लाख ८८ हजार ४६७ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट केंद्रनिहाय तयार करुन पाेर्टलवर लाॅक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या स्थितीत भंडारा जिल्ह्यात ४६ केंद्रांना धान खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. दहा लाख ६४१ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे. गतवर्षी २०७ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली हाेती. यंदा सुरुवातीला केवळ ४६ केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नवीन १३७ केंद्रांचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यांनाही लवकरच मान्यता मिळणार आहे. 

ही आहेत ४६ धान खरेदी केंद्रे भंडारा तालुक्यातील कारधा, धारगाव, वाकेश्वर, पहेला, माेहाडी तालुक्यांतील माेहाडी, माेहगावदेवी, तुमसर तालुक्यातील हरदाेली सिहाेरा, सिहाेरा, मांगली (तुमसर), तामसवाडी, माेहाडी खापा, हरदाेली आंबागड, लाखनी तालुक्यातील सालेभाटा, जेवनाळा, पिंपळगाव, लाखाेरी, लाखनी, मुरमाडी तूपकर, साकाेली तालुक्यातील सानगडी, साकाेली, विरसी, वडेगाव, निलज, धर्मापुरी, लवारी, लाखांदूर तालुक्यातील भागडी, लाखांदूर मासळ, किन्हाळा, आसाेला, कऱ्हांडला, पुयार, इटान, कुडेगाव, किरमाटी, मांदेड, राजणी, बाेथली आणि पवनी तालुक्यातील वाही, काेदुर्ली, चिचाळ, पवनी, आसगाव, अड्याळ, वलनी, सेंद्री बुज या केंद्राचा समावेश आहे.

५२ हजार शेतकऱ्यांची ऑनलाइन नाेंदणी- धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नाेंदणी करावी लागते. आतापर्यंत जिल्ह्यातील ५२ हजार ७७५ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली आहे. जिल्ह्यात नाेंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या दाेन लाख २३ हजार १०१ आहे. ऑनलाइन नाेंदणीच्या अडचणीमुळे अद्यापही नाेंदणीची अंतिम मुदत १० नाेव्हेंबर आहे. नाेंदणीसाठी ॲप विकसित करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड