शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर व मोहाडी तालुक्यांतील पर्यटनस्थळांचा विकास रखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:50 IST

निधी वाटपात अन्याय : माडगी, चांदपूर गायमुख, धुटेरा तीर्थस्थळ उपेक्षीतच

मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमेत तीर्थस्थळ, पर्यटनस्थळ व जंगलाच्या समावेश आहे. मागील ४० वर्षांपासून उंटाच्या तोंडात जिरा याप्रमाणे येथे राज्य शासनाने निधी दिला. मागील अनेक वर्षांपासून येथील पर्यटनस्थळ, तीर्थस्थळ, उमरेड कन्हांडला अभयारण्याला लागून असलेल्या गावांचा विकास झाला नाही. निसर्गाने या तालुक्यांना भरभरून दिले आहे. शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा संपूर्ण परिसर उपेक्षित आहे. विकासाप्रति लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येते.

तुमसर व मोहाडी तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असून, जिल्ह्यात सर्वात अधिक जंगल या दोन्ही तालुक्यांच्या सीमेत आहे. तुमसर तालुक्याच्या सीमेत वैनगंगा नदी पात्रातील माडगी येथील मिनी पंढरी ही प्रसिद्ध तीर्थस्थळ असून, या तीर्थस्थळाच्या विकास अजूनपर्यंत झाला नाही. नदीपात्रात जल पर्यटनास वाव असूनही लोकप्रतिनिधींचे अजूनपर्यंत लक्ष गेले नाही.

गायमुख हे तीर्थस्थळ लहान महादेव म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे. परंतु या स्थळाच्या विकासाच्या बाबतीत उपेक्षित आहे. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येत महादेवाची यात्रा भरते. येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून, त्या समस्या निधीअभावी रखडल्या आहेत. 

बावनथडी प्रकल्प परिसरात पर्यटनस्थळाच्या प्रस्ताव ही शासन दरबारी रखडला असून, मागील दहा वर्षांपासून येथे नियमानुसार पर्यटनस्थळाची उभारणी करण्यात आली नाही. येथे अजूनही विकासाची प्रतीक्षा आहे. 

गावे उपेक्षितमोहाडी तालुक्याच्या टोकावरील शेवटचे गाव पालोरा आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर सातपुडा पर्वतरांगांमधील उमरेड- कहांडला हा राष्ट्रीय अभयारण्याच्या परिसर आहे. या परिसरातील गावे ही अजूनही उपेक्षित आहेत. येथेही जंगल सफारी व पर्यटनाच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.

ग्रीन व्हॅली चांदपूर प्रतीक्षेत राज्य व राष्ट्रीयस्तराचे नेते येथे नतमस्तक होण्याकरिता हनुमान मंदिरात नित्यनेमाने येतात. येथील तीर्थस्थळाचा विकास मात्र झालेला नाही. ग्रीन व्हॅली चांदपूरच्या प्रस्ताव शासन दरबारी रखडला आहे. सातपुडा पर्वतरांगांत असलेला येथील तलाव हा जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाच्या तलाव म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. येथेही जल पर्यटनाला मोठा वाव असूनही येथे जल पर्यटनाला चालना देण्यात आली नाही. तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर नाकाडोंगरी या गावाजवळ धुटेरा हे तीर्थस्थळही उपेक्षीत आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराtourismपर्यटन